शनिवार, ७ मार्च, २०१५


"संत तुकाराम बीज" निमित्ताने सर्व स्नेहजनांस हार्दिक शुभेच्छा

रामायण घडले |महाभारत घडले |
त्यांना कारणीभूत |होते कुजके शब्द ||
म्हणून शब्द जपावा |शब्द पुजावा |
शब्द पुसावा |बॊलण्या आधी ||
घासावा शब्द |तासावा शब्द |
तोलावा शब्द |बोलण्या पूर्वी ||

शब्द हेचि कातर |शब्द सुईदोरा
बेतावेत शब्द |शास्त्राधारे ||

बोलावे मोजके |नेमके ,खमंग ,खमके |
ठेवावे भान |देश ,काळ ,पात्राचे

बोलावे बरे |बोलावे खरे |
कोणाच्याही मनावर |पाडू नये चरे ||

कोणाचेही वर्म |व्यंग आणि बिंग |
जातपात धर्म |काढूच नये ||

थोडक्यात समजणे |थोडक्यात समजावणे |
मुद्देसुद बोलणे |हि संवाद कला

शब्दांमध्ये झळकावी |ज्ञान ,कर्म ,भक्ती |
स्वानुभवातून जन्मावा |प्रत्येक शब्द ||

शब्दां मुळे दंगल |शब्दां मुळे मंगल |
शब्दांचे हे जंगल |जागृत राहाव

जीभेवरी ताबा |सर्वासुखदाता |
पाणी ,वाणी ,नाणी |नासू नका |

संत तुकाराम.

शुक्रवार, ६ मार्च, २०१५

मी एक भटका
भटकणे माझे काम
कधी गुलाबाचा तर
कधी द्राक्षसवाचा
 घेत भटकतो जाम





तमा न मजला रातकिड्याची
सोबती माझ्या शव माढ्याची
मग भिण्याचे काय काम
भटका मी द्राक्ष सवाचा
घेत भटकतो जाम
देव दानव मजपुढे शुद्र
भटकतो मी दिनरात अभद्र
जगी मी एकटाच रुद्र
भितो मजला राम
भटका मी द्राक्ष सवाचा
घेत भटकतो जाम
...............नितीन खापरे