रविवार, २९ सप्टेंबर, २०१९

ईडीचं वस्त्रहरण

वात्रट-गिरी🤣🤣

ईडीचं वस्त्रहरण

कौरव-पांडवांच्या युद्धात
ईडी मधेच आली
धोतर फेडायचा इरादा तिचा
पण लुगडं टाकून पळून गेली

बायको नव्हती ती कोणाची
ना होती कोणाची साली
पण पुढारी माणूस दिसताच पुढे
कपड्यांनाच हात घाली

भल्याभल्यांच्या कॉलर ला
ईडीची मोठी भीती होती
भिण्याचे कारण तिची
56 इंच छाती होती

भल्या भल्यांना उघडं करायचं
हेच ईडीचं धोरण
पण काकांनी मोठ्या हिमतीने केलं
ईडीचंच वस्त्रहरण

             ✒....   नितीन खापरे
                       9657590650

माझे you tube चॅनेल पहाण्यासाठी खालील लिंक वर
क्लिक करा ही विनंती
https://youtu.be/JAKHI_rN9sk

शुक्रवार, २७ सप्टेंबर, २०१९

ईडी रुपी फासे

वात्रट-गिरी🤣🤣

ईडी रुपी फासे

मफलर झाले ,इंजिन झाले
हातही काळे केले
ईडी चे फासे आता
घड्याळावर आले

घड्याळकाका म्हणे
बँकेत होते गेले
खूप साऱ्या कोटींचे
कर्ज वाटप केले

खरे काय खोटे काय
पांडुरंगास ठाऊक
मतदार मात्र होत आहेत
काकांसाठी भावूक

साप समजून भुई बडवाल तर
हाती येतील ससे
जाणत्यांच्या तोंडाला फेस आणती
ईडी रुपी फासे

       ✒....   नितीन खापरे
                       9657590650

पहा व वाचा  ईडी रुपी फासे ही माझी वात्रटिका आजच्या 27-09-2019 वार शुक्रवारच्या दिव्य मराठी या वर्तमान पत्रात  व लिंक वर क्लिक करून  you tube वर ही पहा   ही विनंती https://youtu.be/oRV4oHP9xHk

सोमवार, १६ सप्टेंबर, २०१९

कमळावरती भुंगे

*वात्रट-गिरी*
*कमळावरती भुंगे*

गोष्ट सांगतो कलियुगातील
ऐक उघडून कान चिंगे
भुं-भुं करती,भिरभिर करती
कमळावरती भुंगे

पळी घेऊनि ओळीत बसती
संत महंता संगे
मध कमळातील प्राशन करण्या
क्रीडा तयांची रंगे

जुनी सतरंजी नाराज झाली
नव्याशी करि ती दंगे
मदमस्त हत्ती सत्तेसाठी
आपल्याच तालात झिंगे

चक्र घड्याळी हातावर टाळी
जनांस ऊर बडवून सांगे
भुं-भुं करती,भिरभिर करती
कमळावरती भुंगे

      ✒....   *नितीन खापरे*
                     बेंबळी,उस्मानाबाद
                       9657590650

शनिवार, १४ सप्टेंबर, २०१९

शिवशाही कडून                     पेशवाई कडे...?

वात्रट-गिरी🤣🤣

शिवशाही कडून
                    पेशवाई कडे...?

आता गादी देखील शिवशाहितुन
पेशवाईत गेली आहे
कोणास कळेना कोण सुग्रीव
अन कोण इथे वाली आहे ?

रोज नव्या नेत्यांच्या हाती
फेटे,श्रीफळ अन शाली आहेत
अत्र,तत्र,सर्वत्र
कमळाची फुलेच अली आहेत

राहिला न शिल्लक विरोधक
लोकशाही इथे मेली आहे
चरव्या घेऊन पळती नेते कारण
कमळी ची गाय व्याली आहे

जनतेस कळेना महाराष्ट्र देशी नेमकी
कोणती शाही आली आहे ?
शिव,निजाम,हुकूम की नागपुरी
पेशवाई आली आहे.....?

       ✒....   नितीन खापरे
            9657590650

शुक्रवार, १३ सप्टेंबर, २०१९

वात्रट-गिरी🤣🤣 एस.बी.जे.पी.

*वात्रट-गिरी*🤣🤣

*एस.बी.जे.पी.*

हल्ली नेत्यांचा स्वाभिमान
खरेच मरून गेला आहे
राजकारणाचा अखाडा
इतुका मलिन झाला आहे?

महाराष्ट्रात सगळीकडे
निसटावंतांचा बोलबाला आहे
खोबरं तिकडं चांगभलं हाच
राजकारण्यांचा टोला आहे

राजकारण म्हणजे
नवीन गलासात
जुन्याच वाईन चा पेला आहे
जो तो पवित्र होण्या
भाजपात गेला आहे

नवीन पक्षांचा उदय अन
जुन्या पक्षांना झोला आहे
महाराष्ट्रात एस.काँग्रेस नंतर एस.बीजेपी
पक्ष उदयास आला आहे

     ✒....   *नितीन खापरे*
             बेंबळी,उस्मानाबाद
            9657590650

शुक्रवार, १४ डिसेंबर, २०१८

अल्प कपड्यात फिरण्याची.....

#अल्प_कपड्यात_फिरण्याची ........

अल्प कपड्यात फिरण्याची
हौस तुजलाच भारी
मग पडणारच नजरा तुजवर
पुरुषी आरपार विखारी

शिक्षित स्त्री तू युगाची
मग कपड्यात का भिकारी
विचारांनी प्रगल्भ हो
कापड्यानी नव्हे ग नारी

पुरुष सगळेच नव्हेत
नजरेने बलात्कारी
काही असतील ही तयांत
आई न ओळखणारी

स्त्री तीच खरी ग
संस्कृती जपणारी
अंगभर कपडे नेसुनी
नजरेतून लपणारी

©® #नितीन_खापरे
      9657590650

गुरुवार, ६ डिसेंबर, २०१८

चारोळी

पावसाच्या सरीत
भिजत ती यावी वाटते

येऊन तिने नजरेला
नजर माझ्या द्यावी वाटते

       नितीन खापरे

बुधवार, ५ सप्टेंबर, २०१८

राम_नावाचा_रावण

#राम_नावाचा_रावण

सावधान जनहो कलयुगी
गजहब झाला आहे
मुली पळविणारा राम नावचा
रावण आला आहे

हा म्हणे गोर-गरिबांच्या
मुली पळवून नेणार 
संमत्ती नसतानाही 
जबरदस्तीने लग्न लावून देणार
पेशव्यांच्या राज्यात शेवटी
दुसरे काय होणार ?
बेटींबचाव नव्हे इथे
कुंटणखाणेच येणार !
विकास सोडून इथे
वाचाळ-वीरांचा बोलबाला आहे
मुली पळविणारा राम नावचा
रावण इथे आला आहे

लेकीबाळी सांभाळा 
रात्र आहे वैऱ्याची
ऐकू  येत  असूनही 
सत्ता आहे भैऱ्याची
￰दखल घेत नाहीत हे
लेकीबाळींच्या शोर्याची 
इथे फक्त चर्चा चालते 
#भिडे मास्तर च्या कैऱ्याची
रयतेचा सरकारवरून 
विश्वास उडून गेला आहे
मुली पळविणारा राम नावचा
रावण इथे आला आहे

दादाहो लेकीबाळींची
काळजी घेत चला 
सत्ताधारी डोमकावळेच
पळवतील तिला
बेटींबचाव अभियानावर 
घालोनिया घाला
प्रतिनिधीच ठेवत आहेत
मुलींवर डोला
मुलींचा बाप भीतीने 
घाबरा-घुबरा झाला आहे
कारण
मुली पळविणारा राम नावचा
रावण इथे आला आहे....

#कवी_नितीन_खापरे
9657590650

शनिवार, २० जानेवारी, २०१८

मानव धर्म वाढवावा

जात ही मानवाला रक्तपीपासु गोचिडिप्रमाणे चिकटलेली विनाशिका आहे त्यावर काल काही ओळी लिहिल्या आहेत बघा पटतात का त्या
#मानव_धर्म_वाढवावा

जाता जात नाही l
तीस जात म्हणती l
जातीच्या विषाणुने l
मानवजन कण्हती ll

जात आफूची गोळी l
जात बूळ्यांची टोळी l
जातीनेच होतसे l
समाजाची होळी ll

जात रंगाने काळी l
जात अंगाने काळी l
पाळूनी सोवळे      l
षंड भाजती हो पोळी ll

जात भुरटा अभिमान l
जात भुरट्यांची शान l
जो सर्वगूण सम्पन्न  l
त्यास जात-पात गौण ll

जात करते शोषण l
असू द्यावे याचे भान l
जगी हुशार तोचि   l
पाळे जातीवर मौन ll

जात अभद्राचे लेणे l
जात दळभद्री जीने l
जातीअंत करोनी    l
करा जिवनाचे सोने ll

सूर्य कोण्हा कधी  l
जात पुसतो का ? l
जात पाहूनी         l
सांगा चंद्र रूसतो का ? ll
जात पाळोनी             l
कुठे बाल्य हसतो का? l
शूद्र म्हणोनी               l
कोण्हा सर्प ढसतो का ?ll

नर आणिक मादा         l
जगी जाती फक्त दोन    l
जात-गोत्र पाळणारे       l
मग तुम्ही आम्ही कोण ?ll

जात हरवीते त्राण        l
जाते घेवुनीया प्राण      l
येत नसे वाचविण्या      l
जातीचा कोणी जण    ll

शिव-शंभू चा वारसा    l
जगी पुढे चालवावा           l
जाती-पातीचा रोग      l
दूर दूर घालावावा       ll
जाती पाळणारा         l
श्वान तो बडवावा        l
जगी सर्व श्रेष्ठ असा    l
मानव धर्म वाढवावा   ll

जगी सर्व श्रेष्ठ असा    l
मानव धर्म वाढवावा   ll
मानव धर्म वाढवावा   ll

#कवी_नितीन_खापरे
9657590650
दी-20/01/2018

बुधवार, २६ जुलै, २०१७

एल्गार

#मराठयांनो_एल्गार_म्हणा_रे..
(#एक_धगधगते_क्रांतीकाव्य)

शिवबांचे पाईक बना रे
इतिहासात आपुल्या खुणा रे
विसरून जाऊ वाद जुना रे
एक होऊया चला पुन्हा रे

राजधानीवर चाल करण्या
एकाला लाखाने गुणा रे
मराठयांनो एल्गार म्हणा रे..
मराठयांनो एल्गार म्हणा रे..

आश्वासने आता बास झाली
फित मुक्याची ठेवा खाली
आप्तांसाठी धरारे ढाली
तलवार काढा जी म्यान केली

युध्दात मराठे खूब जिंकती
तहात नेहमी हारच झाली
मस्तकात हा विचार ठेवूनी
जपून चाला पुढल्या चाली

आरक्षण आम्हां देत नाहीत
सरकार ची त्या कबर खणा रे
मराठयांनो एल्गार म्हणा रे..
मराठयांनो एल्गार म्हणा रे..

लेक मरतो सीमेवर जाऊन
बाप मरतो विष खावून
बहीण मरते गरीबी पाहून
आई मरते धासत घेवून

गुन्हा केला का शहीद होवून?
गुन्हा केला का स्वराज्य देवून?
महाराष्ट्राला सुरक्षीत ठेवून;
गुन्हा केला का मराठा होऊन

सांगा आमचा काय गुन्हा रे?
मराठयांनो एल्गार म्हणा रे..
मराठयांनो एल्गार म्हणा रे..

पोरे आपली शाळेत जाती
ऐंशी-नव्वद टक्के घेती
तरी लाखांची फीस देती
पटते का ही असली निती?
भविष्याची वाटे भीती
म्हणून लाखांत मराठे येती

किती लावणार आम्हां चुना रे
मराठयांनो एल्गार म्हणा रे..
मराठयांनो एल्गार म्हणा रे..

बाप आमचा करतो शेती
त्याच्या घामाने भिजते माती
जगास खायला देतो रोटी
तरी धान्याला हमीभाव न देती
आश्वासने तुम्ही दिलेली
तुमच्या सारखीच आहेत खोटी

काळ्या आईची भरूनही ओटी
"बा"ची माझ्या झोळी वांझोटी
का वनवास हा आमच्या पोटी?

मराठयांविना महाराष्ट्र सुना रे
मराठयांनो एल्गार म्हणा रे..
मराठयांनो एल्गार म्हणा रे..

माघार आता नका रे घेऊ
ताकद आपली जगास दावू
फितुरीचा शाप आपला
आपल्या पासून दूरच ठेवू
खूब लढलो मातीसाठी
जाती साठी एक होऊ

बहिणीची जे इभ्रत घेती
त्या नराधमाचे मस्तक घेऊ
युध्दात जिंकत आलोच आपण
चला तहातही जिंकून दावू

'शिवकार्य' हे करण्यासाठी
लाखाचे एक कोटी बना रे
मराठयांनो एल्गार म्हणा रे..
मराठयांनो एल्गार म्हणा रे..
मराठयांनो एल्गार म्हणा रे..
मराठयांनो एल्गार म्हणा रे.

-#कवी #नितीन_खापरे
9657590650

जो पर्यंत आपल्या ताईला न्याय मिळत नाही व मराठा समाजास आरक्षण मिळत नाही तोपर्यंत हा लढा असाच चालू राहील.
शेअर करा..
#एक_मराठा_लाख_मराठा

हे धगधगते क्रांतिकाव्य YouTube वर पाहण्यासाठी लिंक:

https://youtu.be/cQT65M32rzM