रविवार, २९ सप्टेंबर, २०१९

ईडीचं वस्त्रहरण

वात्रट-गिरी🤣🤣

ईडीचं वस्त्रहरण

कौरव-पांडवांच्या युद्धात
ईडी मधेच आली
धोतर फेडायचा इरादा तिचा
पण लुगडं टाकून पळून गेली

बायको नव्हती ती कोणाची
ना होती कोणाची साली
पण पुढारी माणूस दिसताच पुढे
कपड्यांनाच हात घाली

भल्याभल्यांच्या कॉलर ला
ईडीची मोठी भीती होती
भिण्याचे कारण तिची
56 इंच छाती होती

भल्या भल्यांना उघडं करायचं
हेच ईडीचं धोरण
पण काकांनी मोठ्या हिमतीने केलं
ईडीचंच वस्त्रहरण

             ✒....   नितीन खापरे
                       9657590650

माझे you tube चॅनेल पहाण्यासाठी खालील लिंक वर
क्लिक करा ही विनंती
https://youtu.be/JAKHI_rN9sk

शुक्रवार, २७ सप्टेंबर, २०१९

ईडी रुपी फासे

वात्रट-गिरी🤣🤣

ईडी रुपी फासे

मफलर झाले ,इंजिन झाले
हातही काळे केले
ईडी चे फासे आता
घड्याळावर आले

घड्याळकाका म्हणे
बँकेत होते गेले
खूप साऱ्या कोटींचे
कर्ज वाटप केले

खरे काय खोटे काय
पांडुरंगास ठाऊक
मतदार मात्र होत आहेत
काकांसाठी भावूक

साप समजून भुई बडवाल तर
हाती येतील ससे
जाणत्यांच्या तोंडाला फेस आणती
ईडी रुपी फासे

       ✒....   नितीन खापरे
                       9657590650

पहा व वाचा  ईडी रुपी फासे ही माझी वात्रटिका आजच्या 27-09-2019 वार शुक्रवारच्या दिव्य मराठी या वर्तमान पत्रात  व लिंक वर क्लिक करून  you tube वर ही पहा   ही विनंती https://youtu.be/oRV4oHP9xHk

सोमवार, १६ सप्टेंबर, २०१९

कमळावरती भुंगे

*वात्रट-गिरी*
*कमळावरती भुंगे*

गोष्ट सांगतो कलियुगातील
ऐक उघडून कान चिंगे
भुं-भुं करती,भिरभिर करती
कमळावरती भुंगे

पळी घेऊनि ओळीत बसती
संत महंता संगे
मध कमळातील प्राशन करण्या
क्रीडा तयांची रंगे

जुनी सतरंजी नाराज झाली
नव्याशी करि ती दंगे
मदमस्त हत्ती सत्तेसाठी
आपल्याच तालात झिंगे

चक्र घड्याळी हातावर टाळी
जनांस ऊर बडवून सांगे
भुं-भुं करती,भिरभिर करती
कमळावरती भुंगे

      ✒....   *नितीन खापरे*
                     बेंबळी,उस्मानाबाद
                       9657590650

शनिवार, १४ सप्टेंबर, २०१९

शिवशाही कडून                     पेशवाई कडे...?

वात्रट-गिरी🤣🤣

शिवशाही कडून
                    पेशवाई कडे...?

आता गादी देखील शिवशाहितुन
पेशवाईत गेली आहे
कोणास कळेना कोण सुग्रीव
अन कोण इथे वाली आहे ?

रोज नव्या नेत्यांच्या हाती
फेटे,श्रीफळ अन शाली आहेत
अत्र,तत्र,सर्वत्र
कमळाची फुलेच अली आहेत

राहिला न शिल्लक विरोधक
लोकशाही इथे मेली आहे
चरव्या घेऊन पळती नेते कारण
कमळी ची गाय व्याली आहे

जनतेस कळेना महाराष्ट्र देशी नेमकी
कोणती शाही आली आहे ?
शिव,निजाम,हुकूम की नागपुरी
पेशवाई आली आहे.....?

       ✒....   नितीन खापरे
            9657590650

शुक्रवार, १३ सप्टेंबर, २०१९

वात्रट-गिरी🤣🤣 एस.बी.जे.पी.

*वात्रट-गिरी*🤣🤣

*एस.बी.जे.पी.*

हल्ली नेत्यांचा स्वाभिमान
खरेच मरून गेला आहे
राजकारणाचा अखाडा
इतुका मलिन झाला आहे?

महाराष्ट्रात सगळीकडे
निसटावंतांचा बोलबाला आहे
खोबरं तिकडं चांगभलं हाच
राजकारण्यांचा टोला आहे

राजकारण म्हणजे
नवीन गलासात
जुन्याच वाईन चा पेला आहे
जो तो पवित्र होण्या
भाजपात गेला आहे

नवीन पक्षांचा उदय अन
जुन्या पक्षांना झोला आहे
महाराष्ट्रात एस.काँग्रेस नंतर एस.बीजेपी
पक्ष उदयास आला आहे

     ✒....   *नितीन खापरे*
             बेंबळी,उस्मानाबाद
            9657590650