सोमवार, २२ मे, २०१७

म्हणं अच्छे दिन आयेंगे

सत्ता बदल होऊन 3 वर्ष होत आली तरी कवीतेतुन सरकार चा लेखाजोगा मांडण्याचा हा छोटासा प्रयत्न
👇👇👇👇👇👇👇👇
*म्हणं अच्छे दिन आयेंगे*

बघता बघता झाली
तीन वर्ष पूर्ण
पण सरकारचे चालूच आहे
आजुनही थापा मारणं
tv वरच्या जाहिरातीवर
वारेमाप खर्च करणं
अन्
न केलेल्या कामाची
वांझोटी बीज पेरणं

कमळा-बाणाची युती झाली
पण अच्छे दिन काय आलं नाहीत
कमळा अजुनही वांझोटीच पण
विकासराव काय झालं नाहीत

कहते थे 60 दिन में
काला धन ले आयेंगे
कर दिखाया मल्ल्या को
देश के बाहर भगायेंगे
वाह रं मोदी
म्हणं अच्छे दिन आयेंगे

सेना-बीजेपी दोघे
एकाच माळेचे मणि
विकास राहिला बाजूला
काढताय ऊनी-दूनी
जनतेसमोर ढोंग करण्याचि
दोघांचीही खोड जुनी
सांगा दारात का पडून आहेत
अजूनही तुरीची गोणी

वाघा-कमळेच्या मिलनानेही
विकासाचे बीज फळले नाही
अच्छे दिन कुठे गेले
रयतेस अजुन कळले नाही

जनते समोर उगी उगी
दोघं भांडतें जायेंगे
जनतेमागे एकमेकांचि
चोरून विष्ठा खायेंगे
वाह रं मोदी
म्हणं अच्छे दिन आयेंगे

उठ सूट शिवबांचा
आशीर्वाद मागायचा
जनता मेली तर मरु देत
आपण सत्तालाभ भोगायचा
फडवीसांनाही मागमूस
आहे का हों वागायचा ?
शेतकरी काय म्हणतोय
ते तरी बघायचा

भेटतोय म्हणून शेतकऱ्याला
मंत्रालयात फोडला
बिचाऱ्याच्या नाकातोंडातून
रक्तच बाहेर काढला
शिवराय असते तर तुम्हांला
हत्तीच्या पायी दिले असते
खरे सांगतो -C.M. चे
चौरंगच केले असते

56" इंच छाती घेऊन
जगामधे गेले
सांगा बरे भारतात
किती इन्वेस्टर आले

समजली तुमची निती
थूकून चाटते जायेंगे
वाह र मोदी
म्हणं अच्छे दिन आयेंगे

अन्नदाता शेतकरी
रोज आत्महत्या करतोय
भांडवलशाही विरुध्द लढताना
कामगार इथे हारतोय
पाकिस्तानच्या सीमेवर
रोजच जवान मरतोय
अन् आमचा  प्रधानमंत्री
देश-विदेश फीरतोय

पाकिस्तानी आपने जवानों के
सर काट के ले जायेंगे
और आप खाली tv पर
उसको धमकी देते चिल्लयेंगे
फिर भी हम देशप्रेमी
मोदी-मोदी गायेंगे
वाह रं मोदी
म्हणं अच्छे दिन आयेंगे

6 महिन्यापासून जनतेला
रांगेत उभा केलं
किती तरी जनांच
उन्हात जीव गेलं
ATM फिरुन फिरुन लोकांच्या
जीवाचे होतात हालं
पण ATM मधे अजूनही
पैसे नाही आलं
ब्लॅक मनिवाल्यां ऐवजी
कष्टकरीच मेलं
खरेच आलमगिर तुम्ही
मोठं पाप केलं
सांगा नोटबंदी ने
काय साध्य झालं

रचा आमचे सरण
अन् आम्ही त्याच्यावर सोयींगे
वाह रं मोदी
म्हणं अच्छे दिन आयेंगे
वाह रं मोदी
म्हणं अच्छे दिन आयेंगे

कवि
*नितीन खापरे*
9657590650

*आवडल्यास नक्की पुढे पाठवा*

शनिवार, १३ मे, २०१७

नाटकांचा फड

वाचा शेतकर्यांची वेदना व्यक्त करणारी माझी कविता चालू आठवड्यातिल #चीत्रलेखा साप्ताहिकामधे
नुकतेच अखिल भारतीय मराठी नाट्य सम्मेलन संत गोरोबा काकांच्या उस्मानाबाद या पुण्यभूमीत पार पडले त्या सम्मेलनावर केलेला करोडो रुपयांचा वारेमाप खर्च आणि तिथे प्रेक्षकांनी फिरवलेली पाठ व मराठवाड्यात सतत  दुष्काळ असून ही शेतकऱ्यांची शासन दरबारी होणारी सततची  अव्हेलना ही मी या कवीतेतुन मांडण्याचा प्रयत्न केला आहे

#शेतकऱ्यांच्या_नजरेतून
#नाटकांचा_फड

गोरोबा काकांच्या नगरीत
रंगला नाटकांचा फड
एक शेतकरी तिथे गेला
पाऊले टाकत जड़
अडाणी होता बिचारा
त्याला कसली चड ?
वाटले चुकून इथे तरी
सरकार भागवेल नड

प्रवेश द्वारात इकडे-तिकडे
बॉंन्सर उभे होते
खुर्च्या सर्व रिकाम्या
मोजून चारच बघे होते

शेतकऱ्याने तिथला
डामडौल पाहिला
वीस्मयीत होऊन
नुसताच पहात राहिला
वारेमाप केलेला खर्च
अन् कलाकारांचा हर्ष
वाटले आमच्या दुःखावर
कोण्ही करेल का इथे सर्च
ओरडून सांगेल का जगाला
शेतकऱ्यांचा संघर्ष

तेवढ्यात एक पत्रकार येयून
खाली बसा म्हणाला
एकपात्री चालू आहे
खूप हसा म्हणाला

शेतकरी म्हणाला सायेब,
हसून काय होणार
थोडीच माझ्या शेतात
पाणी आहे येणार
थोडीच माझे कर्ज
माफ आहे  होणार
थोडीच माझ्या तुरीला
चांगला भाव देणार
आणि थोडीच माझ्या पोरीचे
लग्न आहे होणार

शहाणे असूनही तुम्ही
वेढ्यासारखे वागा
आम्ही आत्महत्या करतो
तुम्ही इवेंट म्हणून बघा
इथे करोडो खर्च करा
आम्हाला मदत देऊ नगा
मीरुग कोरडा जाईल
कोरड्याच जातील मगा
तरी पाझर फुटणार नाही
सरकार सारख्याच ढगा
शेतकऱ्याच्या मनाचा
झाला होता त्रागा

पत्रकार खाली मान घालून
बाजूला उभा राहिला
शेतकरी रडत जाताना
मी स्वतः पाहिला
शेतकरी रडत जाताना
मी स्वतः पाहिला
मी स्वतः पाहिला........

#स्वलीखीत
#नितीन_खापरे_पाटील
9657590650