गुरुवार, २५ डिसेंबर, २०१४
सोमवार, १३ ऑक्टोबर, २०१४
बुधवार, २७ ऑगस्ट, २०१४
मी पाहिलेय
मी पाहिलेय राजांना पडताना
पाहिलेय मी राज्य कोलमडताना
मी पाहिलेय राजांना पडताना
पाहिलेय मी राज्य कोलमडताना
लोकांच काय घेऊन बसलात
मी पाहिलेय पावलोपावली
लोकांना विश्वास तोडताना
स्वलिखित
नितीन खापरे
दि.२८/०८/२०१४
मंगळवार, १९ ऑगस्ट, २०१४
सोमवार, १८ ऑगस्ट, २०१४
शनिवार, १६ ऑगस्ट, २०१४
रविवार, १० ऑगस्ट, २०१४
रविवार, ३ ऑगस्ट, २०१४
सीमाभाग
सीमाभाग
दिल्या कितीही धमक्या
बंद केल सीमेच दार
तरी लक्षात ठेवा एक
वाढेल तलवारीची धार
मराठी आहोत आम्ही
नाही मानणार अशी हार
शिवबाचे नाव घेऊन
झेलू छाताडावर वार
काळे कानडी सरकार,
दडपशाही काळी ,
काळी कानडी मन
अन माणसेहि काळी
पण लक्षात ठेवा एक
आता आहे आमची पाळी
सरकार सकट करून टाकू
कर्नाटकची होळी
मराठ्यांनी तलवारी खाली ठेवल्यात
पण लढणे विसरलो नाही
आम्ही मागे लागलो तर
पाळायला कमी पडेल भूई
कानड्य़ानो थांबवा आता
सीमाभागातील हल्ले
बूरजसकट जागे करू
महाराष्ट्रातील किल्ले
सीमाभागातील मराठीनो
धीर नका सोडू
महाराष्ट्र तूमच्या सोबत आहे
आपण सोबत लढू
त्यांच्या अंगातली गोम
आपणच ठेचून काढू
मराठ्यानो भीमा,कृष्णेच पाणी
यांना नका सोडू
ते नक्की मात घेतील
आपण लढत राहू
एक दिवस कर्नाटकाला
बेळगावचे नाव देऊ
बेळगावच काय आख्खा कर्नाटक
महाराष्ट्रात घेऊ
स्वलिखित
नितीन खापरे
दि. ०४/०८/२०१४
शनिवार, २६ जुलै, २०१४
नागपंचमी
नागपंचमी
येरे येरे सापराया
आणिल्या मी दुध-लाह्या
वचन दे भाऊराया
येशील तू संकट समया
तुजसाठी मी उपवास धरते
दर्शनाने तुझ्या चिंता हरते
२१व्या शतकातही नागपंचमीचे
महत्व आहे
सापाला भाऊ मानण्याचे
मुलींचे तत्व आहे
विषारी असूनही सापाला
बहिणीचे ममत्व आहे
कदाचित बहिण भावाच्या प्रेमामुळेच
सापाला अमरत्व आहे
विष नसूनही डसनारा माणूस
पावलो-पावली भेटतो
यामुळेच विषारी साप
मुलींना भाऊ वाटतो
माणूस मुलीना चावला कि,
माणसाचा विचार गोठतो
म्हणूनच सापाला भाऊ मानण्याचा
मुलींचा विचार पटतो
बहिण भावाचे हे प्रेम
असेच वाढत जावो
सापासारखेच नागपंचमीलाही
अमरत्व प्राप्त होवो
स्वलिखित
नितीन खापरे
दि.२७/०७/२०१४
गुरुवार, २४ जुलै, २०१४
चारोळी
उठ रे मना
आता शहाण्यासारखं वागायचं
हे दुखःमय जीवन
आता नाही जगायचं
आजपासून बंद
तीझा फोटो बघायचं
देवाकडे फक्त
तिझ सुख मागायचं
आजपासून फक्त
स्वतःसाठी जगायचं
स्वलिखित
नितीन खापरे
दि.२४/०७/२०१४
मंगळवार, २२ जुलै, २०१४
भूक
भूक
उठ गड्या उठ
आवळ तुझी मुठ
पोटाच खळग भराया
धावत पुढ सूट
भूतकेत नसतात
रात्रीचाही पळ
थांबू नकोस मधे
जरी पायात आली कळ
घामातून निघून जाईल
अंगावरचा मळ
थांबलास की पोटाला
भुकेची झळ
भुकेल्या पोटाला
मेंदूशी रगड
दया मया नको
बन तू दगड
मातीतून आलास तरी
हिऱ्यासारखा घड
स्वतःचा घास वाचाविण्या
जगाशी झगड
भुकेला नसते जात-पात
ती पहात नाही दिन-रात
ती सैरावैरा पळते
भूक लागली कि,
पोटासोबत आतडेही जाळते
भूकेची किंमत तुझ्यासारख्या
भूकेलेल्याच कळते
खाऊ नकोस कोणी
दिली तूप-साखर
रात्र झाली झोपडीत
परत ये लौकर
खा आईने ठेवलेली
आर्धी चटणी भाकर
दोन तांबे पाणी पिऊन
दे तृप्त ढेकर
चल आता पोत्यावरती
लेपाट घेऊन नीज
उद्या परत चमकेल भूक
जशी चमकत असते वीज
स्वलिखित
नितीन खापरे
दि,२३/०७/२०१४
मंगळवार, १५ जुलै, २०१४
जीवन म्हणजे आहे तरी काय ?
सकाळची न्याहारी आणि एक कप चाय
शाळेला दडी,मित्रांची खोडी,
स्वप्नात सजवलेली तीझी-माझी जोडी
बाकावरची उडी आणि मास्तर ची छडी
खड्यातले पाणी आणि कागदाची होडी
परीक्षेचा ध्यास,अभ्यासाचा ऱ्हास
काठावरती पास,बाबाच बॉस
त्यांनी भरवलेला मारांचा घास
मित्रातील बढाई,PRO. मारण्याची घाई
दुसऱ्या गल्लीत चढाई,पोरीसाठी लढाई
चल दंगा करू उडत गेली पढाई
ड्य़ाम्बिस मास्तर अन सुंदर बाई
पेपर कोरा ठेऊनही संपलेली शाई
कोलेज ला जाने जावई होणे
क्लास मध्ये कमी,बाहेर जास्त रहाणे
मास्तरला न भिणे नडला त्याला धुणे
मित्रांसाठी आपला जीवहि देणे
आईचे प्रेम अन बापाचे टोमणे
कट्ट्यावर बसता तिचे समोरून जाने
मनाला तिच्याकडे भिरकावून देणे
उटता बसता तिचेच भास होणे
पिच्छा करून तिचा होकार घेणे
मग
कॅन्टीन मधली भेट अन बागेतील गप्पा
पुढे पुढे सरकतो एक एक टप्पा
क्रमश. . . . . . . . . . . . .
शनिवार, १२ जुलै, २०१४
पाऊस पडून गेल्यावर...........
पाऊस पडून गेल्यावर
राहिले मागे धुके
बोलून गेले खूप
जरी होते ते मुके
भिजलेला तो क्षण अन
भिजलेला तो वारा
स्वतःशीच गुणगुणत
वहात होता झरा
झराच तो स्वतःच्या
धुंदीत वहात जाई
मधे चढ आला कि
लगेच बगल घेई
माघार घेणे जणू त्याच्या
रक्तातच नाही
तहानलेला हात पसरून
झऱ्यापुढे झुके
पाऊस पडून गेल्यावर
राहिले मागे धुके
बोलून गेले खूप
जरी होते ते मुके
हालत होती झाडे
डुलत होत्या वेली
खारुताई खेळत होती
झाडाच्या त्या खाली
चिमण्या बोलत होत्या
त्यांची बोली
गवताची पाती
झाली होती ओली
पावसामुळे बहरू
लागली होती पिके
पाऊस पडून गेल्यावर
राहिले मागे धुके
बोलून गेले खूप
जरी होते ते मुके
आभाळामधे सुंदर
इंद्रधनूची कमान
हात लावताच लाजत होते
लाजाळूचे पान
नटून गेले आज
हिरवळीने रान
पाहत होतो मी
विसरून देह-भान
धुक्यामुळे सारे दिसत होते फिके
पाऊस पडून गेल्यावर
राहिले मागे धुके
बोलून गेले खूप
जरी होते ते मुके
स्वलिखित
नितीन खापरे
दि . १५/०७/२०१४
बुधवार, ११ जून, २०१४
शनिवार, ३१ मे, २०१४
शुक्रवार, ३० मे, २०१४
वरून राजा तू येऊन जा
अन
क्षीण कूणबी करे विनवणी
वरून राजा तू येऊन जा
जमीन माझी किती तापली
रानामधली पिकं करपली
बघ पाण्याविन झाड झुकली
माणसाची मूख हि सूखली
येऊन जरा तू पाहून जा अन
रानामध्ये तू वाहून जा
वरून राजा तू येऊन जा
वावटळीला कवेत घेऊन
मृत पाचोळा उडतो
उंच उंच जाऊनी तो
तुलाच हात जोडतो
काहीच न बोलता तू,
तो खाली येऊन पडतो
पाय पडता त्याच्यावरती तो
कड-कड कडकडतो
येऊन त्या पाचोळ्याला
संजीवनी तू देऊन जा
वरून राजा तू येऊन जा
पाण्याविन लाखतात गुर
खुरतात खुर
अन
झुकतात तुझ्या म्होर
पहाव तिथ उन्हाच घर
करपून गेल जग सार
किती अंत पहाशी तू र ?
बघ कोरड पडल झर
दोन दिवस राहून जा
झऱ्यामध्ये त्या पोहून जा
वरून राजा तू येऊन जा
अंगाची होते लाही
पान्हे आटूनी गेल्या गाई
दुधावरती साय नाही
सुकुनी गेल्या जाई-जुई
कोकिळाहि गात नाही
चोहीकडे हि त्राही त्राही
तहानेजलेल्या कोकिळेला
दोन थेंब तू देऊन जा
वरून राजा तू येऊन जा
वरून राजा तू येऊन जा
स्वलिखित
नितीन खापरे
दि . ३१/०५/२०१४
गुरुवार, २९ मे, २०१४
प्रेमाची कोडी
अजब असतात प्रेमाची कोडी
त्यांच्या नजरेत जग तर
जगाच्या नजरेत ती दोघ असतात वेढी
नजरा-नजर होते
जवळीकता येते
मग चालू होतो
भेटा-भेटीचा खेळ
खात बसतात बागेत
दोघात एकच भेळ
हळूच जुळू लागतो
दोघांच्या मनाचा मेळ
आकाश सजते,जमीन सजते
यांच्या क्रीडा बघून लाजाळूही लाजते
रात्री दिसतो दिवस आणि दिवसा दिसते रात्र
जुळतात मने जरी जुळत नसले गोत्र
तो तिला जवळ येण्यासाठी
करतो लाडी-गोडी
त्यांच्या नजरेत जग तर
जगाच्या नजरेत ती दोघ असतात वेढी
याचे कॉलेज बुडते
तिचा बुडतो क्लास
दोघांच्या मनी फक्त भेटण्याचा ध्यास
बागेमध्ये जमतात यांच्या गप्पांचे फड
ती बोलते त्याला किसही घेता येत नाही धड
तो बोलतो SORRY मी पहिल्यांदाच करतोय
ती बोलते माझे नाक कश्याला धरतोय
मग ती त्याला मांडीवर घेते
आणि तासंतास त्याची ओढत राहते दाढी
अजब असतात प्रेमाची कोडी
त्यांच्या नजरेत जग तर
जगाच्या नजरेत ती दोघ असतात वेढी
दिवसामागून दिवस जातात
महिन्या मागून महिने
दोघानाही अश्यक्य होते
दोघांचा विरह सहने
त्यांचे चालूच असते एकमेकांना भेटत राहणे
ती बोलते असे एकटक नकोस पाहू
तो बोलतो चल आपण दूर निघून जाऊ
दुसर्या दिवसी तो रिकामा आणि ती ब्याग घेऊन येते
दोघांची स्वारी दोघांच्या जगात दूर निघून जाते
लोकांच्या दृष्टीने SAD आणि
त्यांच्या दृष्टीने HAPPY एंडिंग होते
दूर कोठेतरी पोटाला मारून
तो घेत असतो तिच्यासाठी साडी
अजब असतात प्रेमाची कोडी
त्यांच्या नजरेत जग तर
जगाच्या नजरेत ती दोघ असतात वेढी
स्वलिखित
नितीन खापरे
दि.२९/०५/२०१४
शनिवार, १० मे, २०१४
कातरवेळ
कातरवेळ
सकाळपासून चालू असतो
उन्हाचा सावलीशी
पाठशिवणीचा खेळ
चार नंतर आपसूक येते
सुखावणारी कातर वेळ
कातरवेळेत मन थंड, सुन्न होत
झाडामधून पडणारा हलता
पान हलताच कवडस्याच
अलगद गायब होण
हवा थांबली कि त्याच
पुन्हा जागेवर येण
प्राण नसलेल्या पाचोळ्याच
निपचित पडून रहाण
झुळूक येता हवेची
अलगद उडून जाण
फांदीच्या अडून ऐकू येत
चिमणीच चिव-चिव गाण
कातरवेळेत चालू असत
माझ अंगणात पहाण
निसर्गाने अचूक साधलाय
एकमेकांचा मेळ
चार नंतर आपसूक येते
सुखावणारी कातर वेळ
कातरवेळेत संथ विचार
मनामध्ये साचतात
थंड हिरवी झाडे पाहून
विचार माझे भिजतात
भिजलेल्या विचारांनी
काव्य माझे भिजलेले
त्या काव्यावेलीखाली आहे
हरणाचे कोकरू निजलेले
कोकराला हि आवडत असावा
याच वेळेचा खेळ
चार नंतर आपसूक येते
सुखावणारी कातर वेळ
स्वलिखित
नितीन खापरे
दि. १०/०५/२०१४
गुरुवार, ८ मे, २०१४
मंगळवार, १५ एप्रिल, २०१४
शुक्रवार, ११ एप्रिल, २०१४
एकलव्य
सर मी त्या तिकडे खालच्या वस्तीत राहतो
तुम्ही खूप ज्ञानी आहात बोलत होता जो-तो
ज्ञानाने तुमच्या प्रभावित होऊन
आलोय ज्ञान घ्यायला
फाटक्या डोक्याची झोळी आणलीय
नाही म्हणू नका द्यायला
ओंजळ पसरतोय तुमच्या पुढे
जमेल तेवढे टाका
जीवन भर ऋणी राहीन
नाही देणार धोका
जास्त काही नाही मला
जगायच कस शिकावा
जगत जगत दुसरऱ्याला
जगवायचंही दाखवा
सांगा मला सूर्याकड एकटक कस बघायचं
दुखात असूनही स्मित करत करत वागायचं
बी बनून काळ्या मातीमध्ये रुजायच
तहानेजुन ही दुसर्यांना पाणी कस पाजायच
शिकवा मला भाषा ,इतिहास आणि भूगोल
तुमच्या भाषेत कळू द्या विज्ञानाचे बोल
पाहू द्या समुद्रात उतरून किती आहे खोल
कळू द्या पृथ्वी का आहे गोल
आणि
किती असते मातेच्या ममत्वाला मोल
सांगा त्रास देणाऱ्या गुंडांना कसे नमवायचे
आपल्याच गुर्मीत असणाऱ्या राजकीय
घोड्यांना कसे दमवायचे
पैसा-अडक्यासोबत नाव कसे कमवायचे
नाराज झालेल्या लोकांना कोणत्या भाषेत मनवायचे
जमल तर शिकावा मला सत्य,आढळ राहायला
असत्याच्या टोळक्यमधून सत्याकडे पाहायला
कितीही मोठा असला तरी प्रवाहाविरुद्ध वहायला
स्वतःच्या संपत्ती मधून पिडीताना दान द्यायला
सांगा मला
जगाच्या भाषेत जगाशी कस लढायचं
हरलो तरी लढत लढत धारातीर्थी पडायचं
गोड बोलणाऱ्या लोकांतून स्वतःला बाहेर काढायचं
आणी
ओपचारीक्ता सोडून मनमोकळ रडायचं
इच्छा आहे माझी
तुमच्याकडूनच ज्ञान घेईन
वचन देतो अर्जुन नाही
एकलव्य होईन
गुरुदक्षिणा म्हणून अंगठाच काय ?
मस्तकहि माझ देईन
माफ करा सर थोड जास्त ज्ञान मागतोय
तुमच्याकड जरा जास्तच आशेन बघतोय
पण काळजी असू द्या तुमच ज्ञान मला
आयुष्यभर पुराव
मला पुरून थोडस मागच्यानाही उरावं
स्वलिखित
नितीन खापरे
दि. १२/०४/२०१४
तुम्ही खूप ज्ञानी आहात बोलत होता जो-तो
ज्ञानाने तुमच्या प्रभावित होऊन
आलोय ज्ञान घ्यायला
फाटक्या डोक्याची झोळी आणलीय
नाही म्हणू नका द्यायला
ओंजळ पसरतोय तुमच्या पुढे
जमेल तेवढे टाका
जीवन भर ऋणी राहीन
नाही देणार धोका
जास्त काही नाही मला
जगायच कस शिकावा
जगत जगत दुसरऱ्याला
जगवायचंही दाखवा
सांगा मला सूर्याकड एकटक कस बघायचं
दुखात असूनही स्मित करत करत वागायचं
बी बनून काळ्या मातीमध्ये रुजायच
तहानेजुन ही दुसर्यांना पाणी कस पाजायच
शिकवा मला भाषा ,इतिहास आणि भूगोल
तुमच्या भाषेत कळू द्या विज्ञानाचे बोल
पाहू द्या समुद्रात उतरून किती आहे खोल
कळू द्या पृथ्वी का आहे गोल
आणि
किती असते मातेच्या ममत्वाला मोल
सांगा त्रास देणाऱ्या गुंडांना कसे नमवायचे
आपल्याच गुर्मीत असणाऱ्या राजकीय
घोड्यांना कसे दमवायचे
पैसा-अडक्यासोबत नाव कसे कमवायचे
नाराज झालेल्या लोकांना कोणत्या भाषेत मनवायचे
जमल तर शिकावा मला सत्य,आढळ राहायला
असत्याच्या टोळक्यमधून सत्याकडे पाहायला
कितीही मोठा असला तरी प्रवाहाविरुद्ध वहायला
स्वतःच्या संपत्ती मधून पिडीताना दान द्यायला
सांगा मला
जगाच्या भाषेत जगाशी कस लढायचं
हरलो तरी लढत लढत धारातीर्थी पडायचं
गोड बोलणाऱ्या लोकांतून स्वतःला बाहेर काढायचं
आणी
ओपचारीक्ता सोडून मनमोकळ रडायचं
इच्छा आहे माझी
तुमच्याकडूनच ज्ञान घेईन
वचन देतो अर्जुन नाही
एकलव्य होईन
गुरुदक्षिणा म्हणून अंगठाच काय ?
मस्तकहि माझ देईन
माफ करा सर थोड जास्त ज्ञान मागतोय
तुमच्याकड जरा जास्तच आशेन बघतोय
पण काळजी असू द्या तुमच ज्ञान मला
आयुष्यभर पुराव
मला पुरून थोडस मागच्यानाही उरावं
स्वलिखित
नितीन खापरे
दि. १२/०४/२०१४
तुजवीण सख्या रे
आटूनी गेला स्नेह
सूकूनी गेल्या कळ्या
टाहो फोडीतो देह
ये परतूनी तू सख्या रे
किती मी वाट पाहू
वचन दिले होतेस तू मजला
अजन्म सोबत राहू
आठवत तुजला एकटीच बसते
स्तब्ध होऊनी तुजवर रुसते
स्तब्ध होऊनी तुजवर रुसते
डोळ्यातुनी आश्रू पाझरते
अश्रूंचा झाला डोह
हात धरुनी आठवण सांगते
आश्रूंच्या डोहात पोह
माझ्याच आश्रुत पोहू कशी मी
सांग सख्या रे नाहू कशी मी
तुजवीण आता राहू कशी मी
तुजवीण कोणाची होऊ कशी मी
होतसे तुझाच मोह
जग हे मजला स्मशान वाटे
तुजवीण सारे आनंद खोटे
स्वप्नी आला होतास पहाटे
ये तुझी मी वाट पहाते
मिटव जीवाचा दाह
स्वलिखित
नितीन खापरे
दि.११/०४/२०१४
अश्रूंचा झाला डोह
हात धरुनी आठवण सांगते
आश्रूंच्या डोहात पोह
माझ्याच आश्रुत पोहू कशी मी
सांग सख्या रे नाहू कशी मी
तुजवीण आता राहू कशी मी
तुजवीण कोणाची होऊ कशी मी
होतसे तुझाच मोह
जग हे मजला स्मशान वाटे
तुजवीण सारे आनंद खोटे
स्वप्नी आला होतास पहाटे
ये तुझी मी वाट पहाते
मिटव जीवाचा दाह
स्वलिखित
नितीन खापरे
दि.११/०४/२०१४
बुधवार, ९ एप्रिल, २०१४
प्रेम कराव अस
प्रेम कराव अस आपणाला हव तस
लक्षात ठेवावं एक
नात्याचं होऊ नये हस
हस झाल कि मग
रडू खूप येत
मनातल माणूस
मनामधून उतरूनच जात
मग प्रेमळ नात्याची
दातखीळच बसते
आपल्यासमोर दुनिया
आपल्याच नात्यावर हसते
नात्यात असावा
ओलावा,प्रेम आणि जिव्हाळा
नात्यासाठी लवाव
लावतो जसा लव्हाळा
प्रेम म्हणजे तरी काय ?
दूर असताना उणीव भासणे
आणि जवळ असताना
एकमेकांवर रुसणे
एकमेकांच्या डोळ्यात पाहणे
रुसल्यास जवळ घेणे
आणि मिठीमध्ये विरघळून जाने
पण या गोष्टींचा अर्थ खूप मोठा आहे
गुलाबाचा फाटा आहे
वरून सुंदर फुल असल
तरी खालती कार काटा आहे
प्रेमामुळेच कवी
गालिब वेढा झाला
लैला आणि मजनूने
प्राणत्याग केला
प्राणत्याग करून
काय साध्य झाले
ते गेले मरून अन
लोक विजयी झाले
प्रेम करायचे तर
करा जिवंत राहून
जगा एकमेकांसोबत
जा एकमेकांत विलीन होऊन
मंगळ सूत्रामध्ये चार मनी ओवून
राहा सदैव एकमेकांचे होऊन
स्वलिखित
नितीन खापरेदि . ०९/०४/२०१४
मंगळवार, ८ एप्रिल, २०१४
इलेक्शन फिवर
इलेक्शन फिवर
चालू झाला आता
इलेक्शन फिवर
दारूने भरून जातील
मतदाराचे लिव्हर
घरी जेवणार नाही कोनी
मतदान होईस्तोवर
जो तो दाखवत फिरेल
ज्याची त्याची पावर
कोणी एका बाटलीवर मत देईल
तर कोणी बाटली सोबत
चार-पाच हजारही घेईल
पैसा ज्याच्याकडे
सत्ता त्याच्या हाती जाईल
पुन्हा एकदा रामायणानंतर
महाभारत सुरु होईल
आणि पुन्हा लोकशाही रुपी द्रोपदी
नग्न उभी राहील
स्वार्थी मेडिया T.R.P. साठी
नग्न द्रोपदी उभ्या जगाला दावील
चार दिवस पुरवतील नेते
मतदाराचे लाड
आणि पाच वर्षात मोडून टाकतील
जनतेचे माकड हाड
कितीही पोसले तरी निरुपयोगीच शेवटी
काँग्रेसचे झाड
कमळाला कोठेही लावा
येत नसतो पाड
कोणाच्या गळ्यामध्ये
धर्माची गुंडी
तर कोणी वाटत सुटते
निरपेक्षतेची बुंदी
लोकशाहीत चार दिवस
असते जनतेची चांदी
आणि पाच वार्ष पायाखाली
येड्या बाभळीची फांदी
आणि जवळ असते ती फक्त
आशे ची फाटलेली चिंधी
स्वलिखित
नितीन खापरे
दि . ०८/०४/२०१४
याची सदस्यत्व घ्या:
पोस्ट (Atom)












