*गुलाल*
आज पैश्याने विचारांना
पायदळी तुडवला
निवडून आले ते
अन् गुलाल मी उडवला
त्यांच्याकडे होता पैसा
माझ्याकडे विचार
पैश्यापूढे विचार
झाले पुन्हा लाचार
त्यांनी पैसा फेकून
केला जोरदार प्रचार
मी मात्र विचारांना घेऊन
दारोदार ऊर बडवला
निवडून आले ते
अन् गुलाल मी उडवला
निवडून देणारे ही पैसे घेऊन
होते हाडुक चघळत
दारूचा ग्लास पाहून होते
टपटप लाळ गाळत
कोण्ही मावा खाऊन,
कोण्ही तम्बाकू मळत
त्यांनीच पेटवलेल्या आगीत
त्यांचेच भविष्य जाळत
गुंडशाहिचा झेंडा खांद्यावर घेऊन
दारोदार पळत
घरी आई बाप उपाशी
पण त्यांना नव्हते कळत
मी बोललो अनमोल मते
विकत नसतात रे मिळत
पण तुम्हालाच मते देणार म्हणून
मलाच हवेत चडवला
निवडून आले ते
अन् गुलाल मी उडवला
त्यांची मिरवणूक निघाली
मिरवणुकीत हौशे,गौशे
वाजत होती हालगी,
गरजले ढोल,ताशे
अंगविकशिप्त हावभाव करून
नाचत होते नाचे
कोण्ही साखर वाटत होते,
कोण्ही फेकत होते बत्ताशे
मी कोपऱ्यात उभा राहून
पहात होतो तमाशे
माझ्यावर बत्ताश्या फेकून
मलाच त्यांनी चिडवला
निवडून आले ते
अन् गुलाल मी उडवला
बोललो होतो निवडून आलो तर
परिवर्तन करेन
नाही केला बदल तर
देहांत स्वीकारेन
तुमच्यासाठीच जन्म माझा
तुमच्यासाठीच मरेण
रस्ते,पाणी,शिक्षणा व्यतिरिक्त
अन्य काही करेन
जनहो तुमच्या सुखासाठि
निवडणुकही हरेण
शेवटचे वाक्य प्रमाण माणून
मलाच त्यांनी सडवला
निवडून आले ते
अन् गुलाल मी उडवला
शेवटी व्हायचे तेच झाले
त्यांचेच राज्य आले
पैसा आणि दादागीरीने
गुंड राज्यकर्ते झाले
जनतेच्या निकालाचे
स्वागत मी केले
हरलो तरी शेवटापर्यंत
किल्ला मी लढवला
निवडून आले ते
अन् गुलाल मी उडवला
निवडून आले ते
अन् गुलाल मी उडवला
---------- *नितीन खापरे*
©®
9657590650