तुजवीण सख्या रे
गळून पडल्या पाकळ्या
आटूनी गेला स्नेह
सूकूनी गेल्या कळ्या
टाहो फोडीतो देह
ये परतूनी तू सख्या रे
किती मी वाट पाहू
वचन दिले होतेस तू मजला
अजन्म सोबत राहू
आठवत तुजला एकटीच बसते
स्तब्ध होऊनी तुजवर रुसते
डोळ्यातुनी आश्रू पाझरते
अश्रूंचा झाला डोह
हात धरुनी आठवण सांगते
आश्रूंच्या डोहात पोह
माझ्याच आश्रुत पोहू कशी मी
सांग सख्या रे नाहू कशी मी
तुजवीण आता राहू कशी मी
तुजवीण कोणाची होऊ कशी मी
होतसे तुझाच मोह
जग हे मजला स्मशान वाटे
तुजवीण सारे आनंद खोटे
स्वप्नी आला होतास पहाटे
ये तुझी मी वाट पहाते
मिटव जीवाचा दाह
स्वलिखित
नितीन खापरे
दि.११/०४/२०१४