सोमवार, १८ जानेवारी, २०१६
रविवार, १७ जानेवारी, २०१६
89वे अखिल भारतीय मराठी साहित्य सम्मेलन
89वे अखिल भारतीय मराठी साहित्य सम्मेलन पीम्परी चिंचवड येथे चालू आहे तरी तूम्ही आवश्यभेट दया
माय मराठी
संतांचीये जन्मभूमी
रंगला साहित्याचा रंग
भाषेचीये प्रेमापोटी
लागला साहित्याचा संग
गाऊ किती गोडवा
माझ्या माय मराठीचा
माझ्या भाषेविना शूद्र
इथे पामराची वाचा
दादा,आई,ताई
प्रेमळ शब्द इथे
मराठीभाषे विना
जीवन कीहो रिते
माराठिच्या खोडामधे
जणू कस्तूरीचा गाभा
शिकुनिया मायबोली
गवसनी घालूयाना नभा
साखरेहूनि रसाळ
माझे भाषेचीये गोडी
साहित्यात रंगुनि
तूम्ही चाखा की हो थोडी
चोखा,तूका माझ्या
भाषेचीये दास
मी ही कैसा घेऊ
मराठीविना श्वास
नितीन म्हणे मला
मोह आवरेना
मराठी वाचूनि
माझी जीभ सावरेना
करीन म्हणतो माझे
भाषेचिये सेवा
थोडीशी प्रतिभा
मला दान देगा देवा
स्वलीखीत
नितीन खापरे
दी.18/01/2016
याची सदस्यत्व घ्या:
पोस्ट (Atom)