वाचा शेतकर्यांची वेदना व्यक्त करणारी माझी कविता चालू आठवड्यातिल #चीत्रलेखा साप्ताहिकामधे
नुकतेच अखिल भारतीय मराठी नाट्य सम्मेलन संत गोरोबा काकांच्या उस्मानाबाद या पुण्यभूमीत पार पडले त्या सम्मेलनावर केलेला करोडो रुपयांचा वारेमाप खर्च आणि तिथे प्रेक्षकांनी फिरवलेली पाठ व मराठवाड्यात सतत दुष्काळ असून ही शेतकऱ्यांची शासन दरबारी होणारी सततची अव्हेलना ही मी या कवीतेतुन मांडण्याचा प्रयत्न केला आहे
#शेतकऱ्यांच्या_नजरेतून
#नाटकांचा_फड
गोरोबा काकांच्या नगरीत
रंगला नाटकांचा फड
एक शेतकरी तिथे गेला
पाऊले टाकत जड़
अडाणी होता बिचारा
त्याला कसली चड ?
वाटले चुकून इथे तरी
सरकार भागवेल नड
प्रवेश द्वारात इकडे-तिकडे
बॉंन्सर उभे होते
खुर्च्या सर्व रिकाम्या
मोजून चारच बघे होते
शेतकऱ्याने तिथला
डामडौल पाहिला
वीस्मयीत होऊन
नुसताच पहात राहिला
वारेमाप केलेला खर्च
अन् कलाकारांचा हर्ष
वाटले आमच्या दुःखावर
कोण्ही करेल का इथे सर्च
ओरडून सांगेल का जगाला
शेतकऱ्यांचा संघर्ष
तेवढ्यात एक पत्रकार येयून
खाली बसा म्हणाला
एकपात्री चालू आहे
खूप हसा म्हणाला
शेतकरी म्हणाला सायेब,
हसून काय होणार
थोडीच माझ्या शेतात
पाणी आहे येणार
थोडीच माझे कर्ज
माफ आहे होणार
थोडीच माझ्या तुरीला
चांगला भाव देणार
आणि थोडीच माझ्या पोरीचे
लग्न आहे होणार
शहाणे असूनही तुम्ही
वेढ्यासारखे वागा
आम्ही आत्महत्या करतो
तुम्ही इवेंट म्हणून बघा
इथे करोडो खर्च करा
आम्हाला मदत देऊ नगा
मीरुग कोरडा जाईल
कोरड्याच जातील मगा
तरी पाझर फुटणार नाही
सरकार सारख्याच ढगा
शेतकऱ्याच्या मनाचा
झाला होता त्रागा
पत्रकार खाली मान घालून
बाजूला उभा राहिला
शेतकरी रडत जाताना
मी स्वतः पाहिला
शेतकरी रडत जाताना
मी स्वतः पाहिला
मी स्वतः पाहिला........
#स्वलीखीत
#नितीन_खापरे_पाटील
9657590650
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा