वात्रट-गिरी🤣🤣
ईडी रुपी फासे
मफलर झाले ,इंजिन झाले
हातही काळे केले
ईडी चे फासे आता
घड्याळावर आले
घड्याळकाका म्हणे
बँकेत होते गेले
खूप साऱ्या कोटींचे
कर्ज वाटप केले
खरे काय खोटे काय
पांडुरंगास ठाऊक
मतदार मात्र होत आहेत
काकांसाठी भावूक
साप समजून भुई बडवाल तर
हाती येतील ससे
जाणत्यांच्या तोंडाला फेस आणती
ईडी रुपी फासे
✒.... नितीन खापरे
9657590650
पहा व वाचा ईडी रुपी फासे ही माझी वात्रटिका आजच्या 27-09-2019 वार शुक्रवारच्या दिव्य मराठी या वर्तमान पत्रात व लिंक वर क्लिक करून you tube वर ही पहा ही विनंती https://youtu.be/oRV4oHP9xHk
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा