गुरुवार, १७ नोव्हेंबर, २०१६

विठू नामाचे डोहाळे

*तुका लागले डोहाळे*

माझ्या तूक्याला लागती
विठू नामाचे डोहाळे
लवतो विठू  पुढे
जसे  नदीचे लव्हाळे
नाचे कीर्तनात दंग
गळा तुळशी पोवळे
हट्ट विठू  दर्शनाचा
धरी बाळ ते कोवळे

विठू नाम घेता
मरे त्याची भूक
विठू नाम चाखे
जैसे साखरेत तूप
जगी विठू नाम खरे
बाकी सगळेच चूक
विठू नामावीणा
तुका मनी रुखरुख

जगी कैसे हे डोहाळे
मूल बापाला ओवाळे
विठू धावे पंढरीशी
तुका मागूनिया पळे
विठू नामाचे दळण
तुका दिन-रात दळे

नितीन म्हणे तुका
गुरु मी मानिला
अभंग मी त्याचा
माझ्या शब्दात वीनीला
त्याच्या अभंगातुनी
आज विठू मी जाणिला
त्याच्या अभंगांतूनी
बळ येवू  दे वाणिला

                   �-- *नितीन खापरे*

रविवार, १३ नोव्हेंबर, २०१६

चारोळी

नका विचारू जीवनाचे हाल मित्रांनो
मी करत फीरतोय घसा ओला

नका विचारू जीवनाचे हाल मित्रांनो
मी करत फीरतोय घसा ओला

जे माझे अप्त होते ना
मला त्यांनीच तर दूर केला

*कवी -नितीन खापरे पाटील*

बुधवार, ५ ऑक्टोबर, २०१६

#प्रत्येक_मराठ्याने_वाचावी_अशी_सुंदर_कविता..._सर्वांना_पाठवा

एक_मराठा_लाख_मराठा

कीर्तनातला टाळ मराठा
वारकऱ्यांची माळ मराठा
महाराष्ट्राची नाळ मराठा
पांडुरंगाचे बाळ मराठा


कुणब्याचे पोरं मराठा
अभंगाचे सार मराठा
तलवारीची धार मराठा
शत्रूवरला वार मराठा

अब्दालीची हार मराठा
झेंडा अटकेपार मराठा
भीर भीर भीरती घार मराठा
शिवबाची तलवार मराठा


वाघांची हि झुंड मराठा
कपाळी भगवा गंध मराठा
स्वराज्याचा छंद मराठा
ध्येय असे बुलंद मराठा


बहिणीसाठी एकसाथ मराठा
जातीने टाकली कात मराठा
आठरा पगड़ ही जात मराठा
वीर दौडले सात मराठा
स्वराज्याचा घाट मराठा
सागराची लाट मराठा
सह्याद्रीचा थाट मराठा


इतिहासातील वक्त मराठा
काळाचेही चक्त मराठा
स्वराज्यासाठी रक्त मराठा
दिल्लीचे राखीतो तख्त मराठा
दगडधोंड्याहून सख्त मराठा
शिवरायांचा भक्त मराठा


राष्ट्रगीतात नाव मराठा
फितुरांनी दिलेला घाव मराठा
युद्धामधला डाव मराठा
घोड्यावरला चेव मराठा
पानीपतची धाव मराठा

टकमक टकमक टोक मराठा

मावळे झाले एक मराठा
भक्श्यावर नजर रोख मराठा
मातीशी ईमान चोख मराठा


म्यान मराठा
बाण मराठा
96 कुळांची खाण मराठा
मन मराठा
होन मराठा
राजमूद्रेचा कोन मराठा
लाज मराठा
साज मराठा
मीडियाने दाबलेला आवाज मराठा


पाण्यामधला माग मराठा
झाडामधला साग मराठा
ऊरात पेटली आग मराठा
डोळ्यामधला राग मराठा
शिवरायांचा वाघ मराठा


पाटीलकीचा वाडा मराठा
कोल्हापूरचा जोड़ा मराठा
पायामधला तोड़ा मराठा
पाणवठ्याचा ओढा मराठा


राजकारण्यांचा नाद मराठा
हिंदू-मुस्लिम वाद मराठा
पोलीस स्टेशनची खाद मराठा
नौकरी मधून बाद मराठा


राज्यकर्त्यांनी वापरला मराठा
स्वराज्यासाठी मेला मराठा
गरीबीत कुजला मराठा
अश्रुंमधे भिजला मराठा


आईच्या लुगड्याचे ठिगळ मराठा
बनीयनचे फाटके बोळ मराठा
गरीबीची झळ मराठा
काळजातली कळ मराठा
अश्रूंचा ओघळ मराठा


शिक्षणातली रेस मराठा
हारून बसला जोश मराठा
ओलांडून गेला वेस मराठा
विखुरलेले अवशेष मराठा


शेणामातीचे घर मराठा
रोजगार तू कर मराठा
फाशी घेऊन मर मराठा
काळीज करते चर्रर्र मराठा


पाऊस नाही येत मराठा
पिकत नाही शेत मराठा
आरक्षण नाही देत मराठा
वीझत चालली ज्योत मराठा
शेतकऱ्याचे प्रेत मराठा


हरवलेले सुख मराठा
पोटामधली भूक मराठा
ऊरात धाकधुक मराठा
आमची काय चूक मराठा
मोर्चामधला मूक मराठा


एकाचा झालास लाख मराठा
मूक्याने भरलास धाक मराठा
जाळून कर तू खाक मराठा


शोभुनी दिसतोस लाख मराठा
सलाम तुजला लाख मराठा
एक मराठा लाख मराठा
एक मराठा लाख मराठा
एक मराठा लाख मराठा


      - #कवी_नितीन_खापरे_पाटील, 9657590650

शुक्रवार, २४ जून, २०१६

तुझ्याविषयी काय बोलू

तू माझी खास आहेस

खर सांगू का ?

तू तर माझा श्वास आहेस

बुधवार, १६ मार्च, २०१६

कई बार

कई बार मैने इंसानों को
मंदिर मज्जीद पे लड़ते देखा है

इन्ही लोगों ने कई बार भूके को
रोटी चूराते  रोका है

                                    स्वलीखीत
                                      नितीन खापरे
                                         दी.१६/०३/२०१६

सोमवार, १४ मार्च, २०१६

पाणी तेवढं दया की

पाणी तेवढ द्याकी……



आमदार साहेब आमदार साहेब
माझ ऐकून घ्याकी
पीक आल्यावर चूकति करीन
शेतसार्याचि बाकी
काही नको राणाला माझ्या
पाणी तेवढ दयाकी


किडूक मिडूक इकून बायकोच
पेरणी तेवढी केली
दोन मास झाल तरी
पावसाची रंडकी नाही झाली
पहिल पीक करपून दुबार पेरणीची येळ आली
दूबार पेरणीसाठी पाण्यात भिजवूण
बी तेवढ दया की


आमदार साहेब आमदार साहेब
माझ ऐकून घ्याकी
काही नको राणाला माझ्या
पाणी तेवढ दयाकी


आमच जाऊ दया नवरा बायकू
हवा पिऊन जगू
पाण्याविना लाखणार्या गूराकड
सांगा कस बघू
खूर खोरून खड्डा करत्यात
पाण्यासाठी जनवार
पाण्याविना करपून गेलंय
शेतं माझ सार

काय सांगू सायब पार गळ्यापातूर आलय
पण कायद्यामंधी आत्महत्याबि गुन्हा म्हणून लिहिलय 

पाण्यासाठी वणवण फिरून 
नऊ आलेत नाकी 

आमदार साहेब आमदार साहेब
माझ ऐकून घ्याकी
काही नको राणाला माझ्या
पाणी तेवढ दयाकी


पाहिजे तर घारातली मत
तूम्हालाच कीहो देईन
शप्पत खातो या खांद्यावर
तूमचाच झेंडा घेईन
इथे तिथे तिथे इथे
प्रचाराचे गीत गाईन
तूम्ही म्हणाल तर
उपाशी पोटी उन्हात
ऊभ राहीन
जास्त काही नाही बदल्यात
पाणी तेवढ घेईन
पण येवढी बार भरून दया
पाण्यान गावची टाकी 

आमदार साहेब आमदार साहेब
माझ ऐकून घ्याकी
काही नको राणाला माझ्या
पानी तेवढ दयाकी


आमचंच चूकलं रानामधली
झाड सारी कापली
म्हणून तर काळी आई
ऊन्हान कीहो तापली
निसर्गदेवी शेतंकार्यावर
क्रूरतेन कोपली
याच्यापूढ मी कोण्हाकड
मदतीला नाही धावणार
वचन देतो म्या ऐकलाच
50 झाड लावणार
पण रोप लावाया वल्ला करून
चीकूल तेवढा दया की

आमदार साहेब आमदार साहेब
माझ ऐकून घ्याकी
काही नको राणाला माझ्या
पाणी तेवढ दयाकी


आमदारांनी PA सांगितले  यांचे
अनुदानाचे काम करून दया
PA बोलले त्यातल्याच दोन नोटांनी
साहेबांचे खिसे भरून दया
मी डोक्यावरुन कपाळावर आलेला
घाम पूसत पूसत उठलो
वाटले मनाला साहेबांना
उगाच तर भेटलो
तरीही थरथरत्या ओठांनी
साहेबांना पूटपूलो
माफ करा साहेब पण
आमच्या मालाला बाजारात
चांगल्या भावान इकू दया
इंग्रजीत नाही निदान आमच्या पोरांना
माराठित तरी शिकू दया
या कूपोषित शेतकऱ्याला
तूमच्या समाजा मधे टिकू दया
जास्त नाही आमदार साहेब
आमच शेतं तेवढ पिकू दया

साहेब बोलले नंतर बोलू
महत्वाची मीटिंग आहे चालू
नमस्कार करून साहेब
हसत निघून गेले
एकाने मला ढकलत ढकलत
बाजूलाच केले
त्याच्या हातात होत दांडक
अंगावर वर्दी खाकी
मी मात्र पुटपुटट राहिलो
माझ ऐकून घ्याकी
काही नको राणाला माझ्या
पाणी तेवढ दयाकी
पाणी तेवढं दया की ...............
                       स्वलीखीत
                     नितीन खापरे
                      दी.१५/०३/२०१६

सोमवार, १८ जानेवारी, २०१६

89 वे मराठी साहित्य सम्मेलणातिल माझी कविता

89 व्या अखिल भारतीय मराठी साहित्य सम्मेलना मधे मझ्या कविता सादर करताना मी

याच साठी केला होता अट्टाहास
साहित्य सम्मेलणाचा दिस गोड झाला

चक्क व्यासपीठावर माझे काव्य सादर करण्याचा
आनंदी क्षण माझ्या वाट्याला आला

प्रेक्षक आणि परिक्षकांनी माझ्या कवितांना भरभरून दाद दिल्याबद्दल त्यांचे मनापासून आभार

रविवार, १७ जानेवारी, २०१६

89वे अखिल भारतीय मराठी साहित्य सम्मेलन

89वे अखिल भारतीय मराठी साहित्य सम्मेलन   पीम्परी चिंचवड येथे चालू आहे तरी तूम्ही आवश्यभेट दया 

 

    माय मराठी 

 

संतांचीये जन्मभूमी

  रंगला साहित्याचा रंग

  भाषेचीये प्रेमापोटी

  लागला साहित्याचा संग

 

 

गाऊ किती गोडवा 

  माझ्या माय मराठीचा 

  माझ्या भाषेविना शूद्र 

  इथे पामराची वाचा 

 

 

दादा,आई,ताई 

  प्रेमळ शब्द इथे 

  मराठीभाषे विना 

  जीवन कीहो रिते 

 

 

माराठिच्या खोडामधे 

  जणू कस्तूरीचा गाभा 

  शिकुनिया मायबोली 

  गवसनी घालूयाना नभा

 

 

साखरेहूनि रसाळ 

  माझे भाषेचीये गोडी 

  साहित्यात रंगुनि 

  तूम्ही चाखा की  हो थोडी 

 

 

चोखा,तूका माझ्या 

  भाषेचीये दास 

  मी ही कैसा घेऊ 

  मराठीविना श्वास 

 

 

नितीन म्हणे मला 

  मोह आवरेना 

  मराठी वाचूनि 

  माझी जीभ सावरेना 

 

करीन म्हणतो माझे 

भाषेचिये सेवा 

थोडीशी प्रतिभा 

मला दान देगा देवा

 

                                                         स्वलीखीत
                                                       नितीन खापरे
                                                      दी.18/01/2016

मंगळवार, २९ डिसेंबर, २०१५

सुप्रसिद्ध प्रेमकवी मंगश पाडगावकर यांचं निधन झालं. त्यांना भावपूर्ण श्रध्दांजली   त्यांच्या सलाम या  कवितेतून  त्यांच्या आठवणींना उजाळा..



        सलाम 

(मंगेश पाडगावकर)      



सबको सलाम
ज्याच्या हातात दंडा
त्याला सलाम,
लाथेच्या भयाने
डावा हात गांडीवर ठेवून
उजव्या हाताने सलाम,
बघणार्याला सलाम,
न बघणार्याला सलाम,
विकत घेणार्याला सलाम,
विकत घेण्याचा इशारा करणार्याला सलाम,
सलाम, भाई,
सबको सलाम.
वटारलेल्या प्रत्येक डोळ्याला सलाम,
शेंदूर फासलेल्या दगडाला सलाम,
लाखो खर्चून बांधलेल्या देवळांना सलाम,
देवळातल्या देवांच्या धाकाला सलाम,
देवांचे आणि धर्माचे कंत्राट घेणाऱ्यांना सलाम,
रिकाम्या हातातून ऊद काढणार्या बडेबुवाला सलाम,
शनीला सलाम,
मंगळाला सलाम,
भितीच्या प्रत्येक ठेकेदाराला सलाम,
आईवर आयुष्यभर गुरगुरणार्या बापाला सलाम,
बापावर गुरगुरणार्या साहेबाला सलाम,
साहेबाची टरकवणार्या
त्याच्या साहेबाला सलाम,
सलाम,प्यारे भाईयों और भैनों,
सबको सलाम.
ज्याच्या हातात वृत्तपत्र
त्याला सलाम,
भाषणांचे, सभांचे
फोटो सकट रिपोर्ट छापतो त्याला सलाम,
वृत्तपत्रांच्या मालकांना सलाम,
त्यांची वेसण धरणार्या
राज्यकर्त्यांना सलाम,
ज्याच्या समोर माइक्रोफोन
त्याला सलाम,
त्यातून न थांबता बोलतो
त्याला सलाम,
लाखोंच्या गर्दीला सलाम,
गर्दी झुलवणार्या
जादुगारांना सलाम,
भाईयों और भैनों, सबको सलाम.
नाक्यावरच्या दादाला सलाम,
हातभट्टीवाल्याला सलाम,
स्मग्लरला सलाम,
मटकेवाल्याला सलाम,
त्यांनी पेरलेल्या हफ्त्यांना सलाम,
लोकशाहीलाबी सलाम,
ठोकशाहीलाबी सलाम,
सत्तेचा ट्रक चालविणार्यांना सलाम,
ट्रकखाली चिरडलेल्या,
गांडुळांना, कुत्र्यांना सलाम,
ज्याच्या हातात चाकू त्याला सलाम,
विमानातून बाँम्ब फेकणार्यांना सलाम,
शस्त्रास्त्रांच्या प्रचंड व्यापार्यांना सलाम,
काळा बाजारवाल्यांना सलाम,
त्यांना फाशी देण्याची घोषणा करणार्यांना सलाम,
गटारातल्या पाण्याने इंजेक्शन भरणार्यांना सलाम,
तिरडीचे सामान विकणार्यांना सलाम,
तिरडी उचलणार्या खांद्यांना सलाम,
मौत सस्ती करणार्या सर्वांना सलाम,
सलाम, प्यारे दोस्तों, सबको सलाम.
बिळांना सलाम,
बिळातल्या उंदरांना सलाम,
घरातल्या झुरळांना सलाम,
खाटेतल्या ढेकणांना सलाम,
पिचलेल्या बायकोला सलाम,
दीड खोलीतल्या पोरडयाला सलाम,
गाडीत चेंगरणार्या गर्दीला सलाम,
किडक्या धान्याला सलाम,
भोके पडलेल्या पिवळ्या गन्जिफ्रॉकला सलाम,
धंद्याच्या मालकाला सलाम,
युनियनच्या लीडरला सलाम,
संपाला सलाम,
उपासमारीला सलाम,
सर्व रंगांच्या सर्व झेंड्यांना सलाम,
चाळीचाळीतून तुंबलेल्या
संडासातल्या लेंड्यांना सलाम,
मानगूट पकडणार्या
प्रत्येक हाताला सलाम,
सलाम, भाइयों और भैनों, सबको सलाम.
या माझ्या परमपवित्र इत्यादी देशाला सलाम,
या देशाच्या सुउदात्त सुमंगल सुपरंपरेला सलाम,
सर्व बिलंदर घोषणांना सलाम,
जातिभेदाच्या उकिरड्यांना सलाम,
या उकिरड्यातून सत्तेचं पीक काढणार्यांना सलाम,
उपनिषदे आणि वेदांना सलाम,
साखर कारखान्यांच्या दादांना सलाम,
त्यांच्या शेकडो लॉर्यांना सलाम,
निवडणुकींना सलाम,
निवडणूक फंडाला सलाम,
अदृष्य बुक्क्यांना सलाम,
मतांच्या आंधळ्या शिक्क्यांना सलाम,
ससा हाती असलेल्या पारध्यांना सलाम,
त्यांच्या तैनातीतल्या गारद्यांना सलाम,
दलितांवर अत्याचार करणार्यांना सलाम,
या बातम्या वाचणार्या सर्व षंढांना सलाम,
सलाम, भाइयों और भैनों, सबको सलाम.
सत्ता, संपत्तीच्या भडव्यांचा देश म्हटले
तर डोके फोडतील,
हलकट लाचारांचा देश म्हटले
तर रस्त्यावर झोडतील,
खरीदले जाणार्यांचा देश म्हटले
तर वाटा रोखतील,
देवधर्माविषयी, नेत्यांविषयी वाईट बोललो
तर नाक्यावर गाठून ठोकतील,
शोषण करणार्यांचा देश म्हटले
तर नोकरीवरुन काढतील,
म्हणून आधी माझ्या नपुंसकत्वाला सलाम,
आणि त्यानंतर अर्थातच
या माझ्या
परमपवित्र सुउदात्त सुमंगल देशाला सलाम,
या महान देशाच्या महान परंपरेला सलाम.
सलाम प्यारे भाइयों और भैनों, सबको सलाम,
अनेक हात असते
तर अनेक हातांनी केला असता सलाम,
लेकिन माफ करना भाइयों,
हात तर दोनच
आणि त्यातला डावा
लाथेच्या भयाने
ठेवलेला गांडीवर
म्हणून फक्त उजव्या हाताने सलाम,
सलाम, सबको सलाम,
भाइयों और भैनों,सबको सलाम.

- मंगेश पाडगांवकर

सोमवार, २६ ऑक्टोबर, २०१५

शायरी

1

मैने अक्सर उसे
महफ़िल में हसते हूये देखा है
और मै रो भी नही सकता
लडका हूं ना

2

बड़ा मजा आता है
मुझे खुद को तकलीफ देकर
उसने जो जख्म दीये है
ये उनके सामने कूछ भी नही

3

वह रे चाहने वाले
दिल तोड़कर पूछते हो
कहीं दर्द तो नही हूवा ?



                            स्वलीखीत
                           नितीन खापरे
                          दी. 27/10/2015