शनिवार, १२ जुलै, २०१४

पाऊस पडून गेल्यावर...........

पाऊस पडून गेल्यावर

राहिले मागे धुके 

बोलून गेले खूप 

जरी होते ते मुके 

भिजलेला तो क्षण अन 

भिजलेला तो वारा 

स्वतःशीच गुणगुणत 

वहात होता झरा 

झराच तो स्वतःच्या 

धुंदीत वहात  जाई 

मधे चढ आला कि 

लगेच बगल घेई 

माघार घेणे जणू त्याच्या 

रक्तातच नाही 

तहानलेला हात पसरून 

झऱ्यापुढे झुके 

 

पाऊस पडून गेल्यावर

राहिले मागे धुके 

बोलून गेले खूप 

जरी होते ते मुके 

हालत होती झाडे 

डुलत होत्या वेली 

खारुताई खेळत होती 

झाडाच्या त्या खाली 

चिमण्या बोलत होत्या 

 त्यांची बोली 

गवताची पाती 

झाली होती ओली 

पावसामुळे बहरू 

लागली होती पिके 


पाऊस पडून गेल्यावर

राहिले मागे धुके 

बोलून गेले खूप 

जरी होते ते मुके

 आभाळामधे सुंदर 

 

 

इंद्रधनूची कमान 

हात लावताच लाजत होते 

लाजाळूचे पान 

नटून गेले आज

 हिरवळीने रान 

पाहत होतो मी 

विसरून देह-भान 

 धुक्यामुळे सारे दिसत होते फिके 

पाऊस पडून गेल्यावर

राहिले मागे धुके 

बोलून गेले खूप 

जरी होते ते मुके 


                       स्वलिखित

                         नितीन खापरे 

                   दि . १५/०७/२०१४

 

 

 












कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत: