शनिवार, १३ मे, २०१७

नाटकांचा फड

वाचा शेतकर्यांची वेदना व्यक्त करणारी माझी कविता चालू आठवड्यातिल #चीत्रलेखा साप्ताहिकामधे
नुकतेच अखिल भारतीय मराठी नाट्य सम्मेलन संत गोरोबा काकांच्या उस्मानाबाद या पुण्यभूमीत पार पडले त्या सम्मेलनावर केलेला करोडो रुपयांचा वारेमाप खर्च आणि तिथे प्रेक्षकांनी फिरवलेली पाठ व मराठवाड्यात सतत  दुष्काळ असून ही शेतकऱ्यांची शासन दरबारी होणारी सततची  अव्हेलना ही मी या कवीतेतुन मांडण्याचा प्रयत्न केला आहे

#शेतकऱ्यांच्या_नजरेतून
#नाटकांचा_फड

गोरोबा काकांच्या नगरीत
रंगला नाटकांचा फड
एक शेतकरी तिथे गेला
पाऊले टाकत जड़
अडाणी होता बिचारा
त्याला कसली चड ?
वाटले चुकून इथे तरी
सरकार भागवेल नड

प्रवेश द्वारात इकडे-तिकडे
बॉंन्सर उभे होते
खुर्च्या सर्व रिकाम्या
मोजून चारच बघे होते

शेतकऱ्याने तिथला
डामडौल पाहिला
वीस्मयीत होऊन
नुसताच पहात राहिला
वारेमाप केलेला खर्च
अन् कलाकारांचा हर्ष
वाटले आमच्या दुःखावर
कोण्ही करेल का इथे सर्च
ओरडून सांगेल का जगाला
शेतकऱ्यांचा संघर्ष

तेवढ्यात एक पत्रकार येयून
खाली बसा म्हणाला
एकपात्री चालू आहे
खूप हसा म्हणाला

शेतकरी म्हणाला सायेब,
हसून काय होणार
थोडीच माझ्या शेतात
पाणी आहे येणार
थोडीच माझे कर्ज
माफ आहे  होणार
थोडीच माझ्या तुरीला
चांगला भाव देणार
आणि थोडीच माझ्या पोरीचे
लग्न आहे होणार

शहाणे असूनही तुम्ही
वेढ्यासारखे वागा
आम्ही आत्महत्या करतो
तुम्ही इवेंट म्हणून बघा
इथे करोडो खर्च करा
आम्हाला मदत देऊ नगा
मीरुग कोरडा जाईल
कोरड्याच जातील मगा
तरी पाझर फुटणार नाही
सरकार सारख्याच ढगा
शेतकऱ्याच्या मनाचा
झाला होता त्रागा

पत्रकार खाली मान घालून
बाजूला उभा राहिला
शेतकरी रडत जाताना
मी स्वतः पाहिला
शेतकरी रडत जाताना
मी स्वतः पाहिला
मी स्वतः पाहिला........

#स्वलीखीत
#नितीन_खापरे_पाटील
9657590650

सोमवार, २० मार्च, २०१७

पाझर

पाझर

रोज नव्या जीवास मारुनी
पूजत बसती दगडांचा ओझर

ईश्वर पुजणारे नश्वर जग हे
यांना कसा रे फुटेल पाझर

उघड्या डोळ्यांनी गुन्हे पहाती
ओढून नयनांवरती सोजर

गुन्हा कराया पुन्हा नव्याने
रांगेत सारे होती हाजर

वैद्य,पुढारी बंधु सारे
लालसा करती जगाचे सीझर

पैसा फेको तमाशा देखो
नव्या मूवी चे नवीन टिझर

रयत असे रे वेढि-थोडी
आशेने पहाते लटकते गाजर

सांगा तयांना गूढ-सत्य ते
वाटत असते दूध का मांजर ?

असहायांना कपटांचा
वरवरचा तो रोजच गोंजर

ईश्वर पुजणारे नश्वर जग हे
यांना कसा रे फुटेल पाझर

                       स्वलीखीत
            ........ नितीन खापरे
                     9657590650
                            ©®

योगीराज

#थोडीशी_वात्रटगिरी

सर्वात मोठ्या चिखलात
कमळ उगवून आले
अभिनंदन योगीराज
मुख्यमंत्री झाले
योगीराज आहेत
R.S.S चे चेले
मोदीरथ अडविण्या
योगीस पुढे केले

योगीराज आणण्या
R.S.S. चा हात आहे
कमळाच्या देठाला
जनतेही साथ आहे

मोदीपेक्षा योगिंचा
हिंदुत्ववाद कडवा
U.P च्या शिरपेचात
विकासवाद जडवा
उत्तर प्रदेश चा
उत्तम प्रदेश घडवा
महाराष्ट्रात येणारे
भैय लोंढे आडवा

योगी आदित्यनाथ उर्फ
अजयसिंग बिश्त
आशा आहे लावून घ्याल
विकासाची शिस्त
महाराष्ट्रातील मराठी
आहेत भैय्ये ग्रस्त
घेऊ दया श्वास आम्हां
छान मोकळा स्वस्त

                        #कवि
                   #नितीन_खापरे
                   9657590650

गुरुवार, २ मार्च, २०१७

चित्रलेखा

वाचा माझी वात्रटीका या आठवड्याच्या चित्रलेखा
साप्ताहिका मधे
               आपलाच कवी -#नितीन_खापरे

सोमवार, २७ फेब्रुवारी, २०१७

#मराठीचे_मारेकरी

मराठी विषयी सध्य स्तीथी
वर्णन करणारी कविता नक्की वाचा

👇👇👇👇👇👇👇👇👇👇👇

#मराठीचे_मारेकरी

हिंदीत बोलुनी आम्ही
मर्हाठीचा खून करतो
मायबोली चे मारेकरी
तिची लेकरे म्हणून फिरतो

मराठीचा मारेकरी
महानगरांतून फीरतो
बहुभाषा बोलुनी
आईच्या कूसेवर मारतो
बोलण्याची सुरुवात
हिंदीतून करतो
मराठी विरोधी पीक
मराठीच पेरतो
परभाषेत बोलुनी
आईचा गळा चीरतो

समोर कोणही असो
आम्ही हिंदीच होतो
मराठी असूनही भैयाकडून
भैया म्हणवून घेतो

अरे दादा म्हणायला शिकवा
हिंदीला मराठीपुढे झूकवा
पुन्हा एकदा मराठीला
अटकेपार झेंडा दाखवा
अवघ्या जगात मराठीचे
असख्यालित पीक पीकवा

तंत्रज्ञान (FB)असे
मायबोलीस मारक
त्यालाच करूयात
मायबोली प्रचारक

अँग्लजाळलेले
सुशिक्षित आपण
मराठीत बोलू
तू पण-मी पण

मराठीत हसु
मराठीत रडू
मराठीत पडू
मराठीत उडू

मराठीत जगू
मराठीत मरु
मराठीची पताका
चला उंच धरू
मराठी बोलण्याचे
प्रण आज करू
मराठी विरोधक
मराठी बोलून मारू

                        स्वलीखीत
                      #नितीन_खापरे
                        9657590650

रविवार, १९ फेब्रुवारी, २०१७

वात्रटगिरी

निवडणुकीच्या तोंडावर थोडीशी वात्रतगिरी
👇👇👇👇👇👇👇👇

वात्रटगिरी

वाघाच्या डरकाळी वर
कमळा चा डराव
बायकोचा-नवऱ्याला
मुम्बई साठी घेराव
बारामतीकर बोलले
हा तर मुदतपूर्वचा सराव
सेने सोबत करून टाकू
अल्प मताचा ठराव

कमळ बाई म्हणते
वाघोबा मोठा चोर आहे
वाघोबा बाण मारतो
कमळा हाराम खोर आहे
बारामती करांच्या हातात
मुदतपूर्व चा दोर आहे
जनताच ठरवेल आता
कोण किती थोर आहे
कोणाच्या मनगटात
मुम्बई साठी जोर आहे

सत्तेसाठी वैरी झाले
हिंदुत्ववादी मित्र
नाड्या पासून वेगळे होतेय
चड्डि चे गोत्र
हळू-हळू स्पष्ट होतेय
सत्तापीपासु चित्र
गुंड इथे पवित्र होती
शिंपडून गौमुत्र
सत्तेतून पैसा आणि पैस्यातून सत्ता
हेच तर  राजकारणाचे सूत्र

                        स्वलीखीत
                      नितीन खापरे
                      दी.17/02/2017

गुरुवार, १६ फेब्रुवारी, २०१७

चीत्रलेखा

क्रमांक एक चे साप्ताहिक #चीत्रलेखा याचे सम्पादक #श्री_ज्ञानेश_महाराव सरांनी चालू आठवड्यातिल #आजकाल हे सदर लिहिताना लेखाच्या अगदी सुरूवातीला माझ्या #माय_मराठी या कवितेचा दाखला देत दखल घेतली आणि नावासहित प्रकाशित केली त्याबद्दल #श्री_ज्ञानेश_महाराव सरांचे स्नेहपूर्वक आभार
ज्यांचे लेख वाचत मोठा झालो त्यांनी आपल्या काव्याला लेखात जागा द्यावी याहून मोठी आनंदाची गोष्ट कोणती असेल ?
                                                                     #Thanx सर जी
                                                                     आपलाच कवी 
                                                                      नितीन खापरे
                                                                      9657590650
                      

रविवार, ५ फेब्रुवारी, २०१७

जोवर भ्रांत होत नाही

जोवर भ्रांत होत नाही

मेलो म्हणून माझा विचार
शांत होत नाही
हा देह तोपर्यंत जळत राहील
जोवर भ्रांत होत नाही

देहाच्या चमडीवर
जिवंत अजूनी घाव
जखमेच्या भेगामधूनी
होतोय रक्तस्राव
थिटे पडले मजवर
विरोधकांचे डाव
इतिहासाच्या काव्यविश्वात
चिरंजीव माझे नाव

देहाला मारून विचारांचा
अंत  होत नाही
हा देह तोपर्यंत जळत राहील
जोवर भ्रांत होत नाही

हाती घेवुनी
ढोंगी धर्मदंड
ठेचुन काढती विचारांना
जे जे करतात बंड
दुसरा विचार अंकुरेल
जरी झाला एक थंड
मरून जाण्या इतूका
विचार नसे हा षंड

टीळा लावूनि माथी
कोण्ही संत होत नाही
हा देह तोपर्यंत जळत राहील
जोवर भ्रांत होत नाही

विचार खुडुनि टाकण्या
देहास जरी मारले
भ्रम गोड तुमचा
विचार माझे हरले
इतिहासाच्या खंडावर
माझेच विचार कोरले
रंजल्या-गांजल्यांच्या डोक्यात
हेच विचार पेरले

एखाद रात्रीने कधीच
उषांत होत नाहि
हा देह तोपर्यंत जळत राहील
जोवर भ्रांत होत नाही

              नितीन खापरे
              9657590650
              05/02/2017

बुधवार, १ फेब्रुवारी, २०१७

पानीपत (एक धगधगता अंगार )

हे👇👇 क्रांती काव्य पानीपत मधील त्या शूरांना अर्पण 
                      
                       
  🚩🚩#पानीपत🚩🚩
                ( #एक_धगधता_अंगार)

अजगरासम यमूनेकाठी गाजला एक  प्रारब्ध
मराठ्यांचा पराक्रम पाहण्या आकाश झाले स्तब्ध
मातृभूच्या रक्षणासाठी लढले वीर प्रक्षुब्ध
पराक्रम तयांचा वर्णीण्या कमी पडतील शब्द

यमूने चे निळे काठही
लाल रक्तात बुडले,
पाणीपत च्या रणमैदानी
असे मराठे लढले
पाहून मराठा त्वेष निर्जीव
दगडांना स्फूरण चढले

गनिम कुणी एल्गार म्हणाले
धुळीचे लोट उंच उडाले
वार्यात गरगर फिरले भाले
रक्तरंजित झाले शेले
महाराष्ट्रभूचे पुत्र सारे
नखशीखा रक्तात न्हाले
जीभ लागता तलवारीची
गनिमांचे मुंडके उडाले
रक्तापिपासू इतिहासावर
सुवर्ण पान हो जडले
इब्राहिमने आहुती देवुनी
पांग मराठी फेडले

पाणीपत च्या रणमैदानी
असे मराठे लढले
पाहून मराठा त्वेष निर्जीव
दगडांना स्फूरण चढले

दत्ताजी शिंदेंचा जोश पाहूनी
मराठ्यांना चढला चेव
एका सुरात गर्जना घुमली
हर हर महादेव

नजीब खान दिसता पुढे
दत्ताजी आफगाण्या कापत सुटले
पाहुनी बेभान पराक्रम
अर्धमेले मावळे ही उठले
तप्त तलवार सप सप वार
झटक्यात आफगानी होती गार
तेज धार,अचूक प्रहार
क्षणात गनिम होती ठार
होऊन लालमनीवर स्वार
धडावर झेलले तोफेचे बार
मराठेच ते,
      कसे मानणार हार
हिमालयाच्या पायावर
रक्ताचेच अभिषेक घडले

पाणीपत च्या रणमैदानी
असे मराठे लढले
पाहून मराठा त्वेष निर्जीव
दगडांना स्फूरण चढले

विश्वासराव अन् जनकोजी
झाले होते बेभान
रोहील्या ची त्या गनिमाची
कापत सुटले मान
कसले हे वेड म्हणावे
कसला तो अभिमान
छातीवरले वार तयांना
वाटत होती शान
मात्रूभूच्या रक्षणासाठी
हसत दिले हो प्राण
पाहुनी त्यांचा पराक्रम
रणमैदानही  धो-धो रडले

पाणीपत च्या रणमैदानी
असे मराठे लढले
पाहून मराठा त्वेष निर्जीव*
दगडांना स्फूरण चढले*

कैक कामी आले,
कैक शहीद झाले
आर्ध्या-बहू महाराष्ट्राचे
कुंकूच पुसून गेले
हिमालयाचे दुःख सह्याद्रीने
आवंढा गिळत पीले
धन्य धन्य ते मावळे
शाडू खावून जगले
परमुलूखात राहून ही
मराठे म्हणून तगले

मराठा नावाचे रत्न
हिमशिखरावर जडले
पाणीपत च्या रणमैदानी
असे मराठे लढले
पाहून मराठा त्वेष निर्जीव
दगडांना स्फूरण चढले

             कवी -- नितीन_खापरे
                 
🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩
🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩

शुक्रवार, ३० डिसेंबर, २०१६

गुलाल

*गुलाल*

आज पैश्याने विचारांना
पायदळी तुडवला
निवडून आले ते
अन् गुलाल मी उडवला

त्यांच्याकडे होता पैसा
माझ्याकडे विचार
पैश्यापूढे विचार
झाले पुन्हा लाचार
त्यांनी पैसा फेकून
केला जोरदार प्रचार
मी मात्र विचारांना घेऊन
दारोदार ऊर बडवला
निवडून आले ते
अन् गुलाल मी उडवला

निवडून देणारे ही पैसे घेऊन
होते हाडुक चघळत
दारूचा ग्लास पाहून होते
टपटप लाळ गाळत
कोण्ही मावा खाऊन,
कोण्ही तम्बाकू मळत
त्यांनीच पेटवलेल्या आगीत
त्यांचेच भविष्य जाळत
गुंडशाहिचा झेंडा खांद्यावर घेऊन
दारोदार पळत
घरी आई बाप उपाशी
पण त्यांना नव्हते कळत
मी बोललो अनमोल मते
विकत नसतात रे मिळत
पण तुम्हालाच मते देणार म्हणून
मलाच हवेत चडवला
निवडून आले ते
अन् गुलाल मी उडवला

त्यांची मिरवणूक निघाली
मिरवणुकीत हौशे,गौशे
वाजत होती हालगी,
गरजले ढोल,ताशे
अंगविकशिप्त हावभाव करून
नाचत होते नाचे
कोण्ही साखर वाटत होते,
कोण्ही फेकत होते बत्ताशे
मी कोपऱ्यात उभा राहून
पहात होतो तमाशे
माझ्यावर बत्ताश्या फेकून
मलाच त्यांनी चिडवला
निवडून आले ते
अन् गुलाल मी उडवला

बोललो होतो निवडून आलो तर
परिवर्तन करेन
नाही केला बदल तर
देहांत स्वीकारेन
तुमच्यासाठीच  जन्म माझा
तुमच्यासाठीच मरेण
रस्ते,पाणी,शिक्षणा व्यतिरिक्त
अन्य काही करेन
जनहो तुमच्या सुखासाठि
निवडणुकही हरेण
शेवटचे वाक्य प्रमाण माणून
मलाच त्यांनी सडवला
निवडून आले ते
अन् गुलाल मी उडवला

शेवटी व्हायचे तेच झाले
त्यांचेच राज्य आले
पैसा आणि दादागीरीने
गुंड राज्यकर्ते झाले
जनतेच्या निकालाचे
स्वागत मी केले
हरलो तरी शेवटापर्यंत
किल्ला मी लढवला
निवडून आले ते
अन् गुलाल मी उडवला

निवडून आले ते
अन् गुलाल मी उडवला

               ---------- *नितीन खापरे*
                                ©®
                      9657590650