महाराष्ट्र राज्यात पहिल्यांदाच शेतकरी सम्पन् चालू असताना सर्व शेतकरी बांधवानी ज्या कवितेला डोक्यावर घेतले व शेतकर्यांच्या मागण्या मान्य झाल्या ती कविता आपणापुढे सादर करत आहे
बांधावरती_येता_का?
मुख्यमंत्री साहेब A/C मधून
बांधावरती येता का?
काही नाही शेतकऱ्यांचे
दुखणे समजून घेता का?😢
तुमची बायको छान
अमिताभ सोबत नाचती आहे
बघा माझी कारभारीण
दिवस-रात राबती आहे
ऊन, वारा, पावसात
ती माझी सोबती आहे
लोडशेडींगमुळं दारं धराया
रात्रभर जागती आहे
कुठल्या जन्माचे पाप
माझ्या सोबत भोगती आहे
कर्जमाफी करणार म्हणून
आशेनं वाट बघती आहे
आणि तिने केलेल्या कष्टाला
हमीभाव ती मागती आहे
आमच्या सोबत डबक्यातले
अशुद्ध पाणी पिता का?
मुख्यमंत्री साहेब A/C मधून
बांधावरती येता का?
काही नाही शेतकऱ्यांचे
दुखणे समजून घेता का?😢
तुमचं पोरगं A/C मधून
कॉनवेंट मधे जातं
माहितीय का काटा टोचल्यावर
किती दुःख होतं?
बाळ माझं तसल्या काट्यांतून
भाकरी घेऊन येतं
विजा पावसात अंगावर
पांघरूण घेऊन पोतं
वासरु माझं झाडाखाली
भिजत बसून रहातं
आजारी पडून दोन दिवस
वाजवत रहातं दात
कसे नेनार दवाखान्यात
पैसाच करतो घात
मी आत्महत्या करू नये म्हणून
आंगावर माझ्या ठेऊन हात
सोनूलं माझं मला
चीकटून झोपी जातं
माझ्या त्या वासराचे
आश्रु पुसून देता का?
मुख्यमंत्री साहेब A/C मधून
बांधावरती येता का?
काही नाही शेतकऱ्यांचे
दुखणे समजून घेता का ?😢
धान्य पिकवतो शेतकरी
भाव ठरवतो व्यापारी
तुम्ही आणि तुमचे दलाल
लावता आहात गळ्यास सूरी
सांगा साहेब ही
रीत वाटते काहो बरी?
पिकवणाराच्या हातामधे
किती दिवस देणार तूरी?
वामण अवतार सोडून
बळीराजा तुम्ही होता का?
मुख्यमंत्री साहेब A/C मधून
बांधावरती येता का ?
काही नाही शेतकऱ्यांचे
दुखणे समजून घेता का ?😢
#नितीन_खापरे
9657590650
शेतकरी असाल तर नक्की पुढे पाठवा 🙏🏻
https://youtu.be/uYpzYvIeKvg
🎤 कवी नितीन खापरे यांचि
डोळ्यांतून पाणी काढणारी
बंधावरती येता का? कविता 😢नक्की पहा व सर्व बांधवांना share करा

