शुक्रवार, ११ एप्रिल, २०१४

एकलव्य


एकलव्य



सर मी त्या तिकडे खालच्या वस्तीत राहतो 
तुम्ही खूप ज्ञानी आहात बोलत होता जो-तो
ज्ञानाने तुमच्या प्रभावित होऊन 
आलोय ज्ञान घ्यायला 
फाटक्या डोक्याची झोळी आणलीय 
नाही म्हणू नका द्यायला 
ओंजळ पसरतोय तुमच्या पुढे 
जमेल तेवढे टाका 
जीवन भर ऋणी राहीन 
नाही देणार धोका 


जास्त काही नाही मला 
जगायच कस शिकावा 
जगत जगत दुसरऱ्याला 
जगवायचंही दाखवा 
सांगा मला सूर्याकड एकटक कस बघायचं 
दुखात असूनही स्मित करत करत वागायचं 
बी बनून काळ्या मातीमध्ये रुजायच 
तहानेजुन ही दुसर्यांना पाणी कस पाजायच

शिकवा मला भाषा ,इतिहास आणि भूगोल 
तुमच्या भाषेत कळू द्या विज्ञानाचे बोल 
पाहू द्या समुद्रात उतरून किती आहे खोल 
कळू द्या पृथ्वी का आहे गोल 
आणि 
किती असते मातेच्या ममत्वाला मोल 


सांगा त्रास देणाऱ्या गुंडांना कसे नमवायचे 
आपल्याच गुर्मीत असणाऱ्या राजकीय 
घोड्यांना कसे दमवायचे 
पैसा-अडक्यासोबत नाव कसे कमवायचे 
नाराज झालेल्या लोकांना कोणत्या भाषेत मनवायचे

जमल तर शिकावा मला सत्य,आढळ राहायला 
असत्याच्या टोळक्यमधून सत्याकडे पाहायला 
कितीही मोठा असला तरी प्रवाहाविरुद्ध वहायला 
स्वतःच्या संपत्ती मधून पिडीताना दान द्यायला 

सांगा मला
जगाच्या भाषेत जगाशी कस लढायचं 
हरलो तरी लढत लढत धारातीर्थी पडायचं 
गोड बोलणाऱ्या लोकांतून स्वतःला बाहेर काढायचं 
आणी
ओपचारीक्ता सोडून मनमोकळ रडायचं

इच्छा आहे माझी 
 तुमच्याकडूनच ज्ञान घेईन 
वचन देतो अर्जुन नाही 
एकलव्य होईन 
गुरुदक्षिणा म्हणून अंगठाच काय ? 
मस्तकहि माझ देईन 


 माफ करा सर थोड जास्त ज्ञान मागतोय 
तुमच्याकड जरा जास्तच आशेन बघतोय 
पण काळजी असू द्या तुमच ज्ञान मला 
आयुष्यभर पुराव 
मला पुरून थोडस मागच्यानाही उरावं 




                                                                     स्वलिखित 
                                                                      नितीन खापरे 
                                                                    दि. १२/०४/२०१४



 










कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत: