प्रेम कराव अस आपणाला हव तस
लक्षात ठेवावं एक
नात्याचं होऊ नये हस
हस झाल कि मग
रडू खूप येत
मनातल माणूस
मनामधून उतरूनच जात
मग प्रेमळ नात्याची
दातखीळच बसते
आपल्यासमोर दुनिया
आपल्याच नात्यावर हसते
नात्यात असावा
ओलावा,प्रेम आणि जिव्हाळा
नात्यासाठी लवाव
लावतो जसा लव्हाळा
प्रेम म्हणजे तरी काय ?
दूर असताना उणीव भासणे
आणि जवळ असताना
एकमेकांवर रुसणे
एकमेकांच्या डोळ्यात पाहणे
रुसल्यास जवळ घेणे
आणि मिठीमध्ये विरघळून जाने
पण या गोष्टींचा अर्थ खूप मोठा आहे
गुलाबाचा फाटा आहे
वरून सुंदर फुल असल
तरी खालती कार काटा आहे
प्रेमामुळेच कवी
गालिब वेढा झाला
लैला आणि मजनूने
प्राणत्याग केला
प्राणत्याग करून
काय साध्य झाले
ते गेले मरून अन
लोक विजयी झाले
प्रेम करायचे तर
करा जिवंत राहून
जगा एकमेकांसोबत
जा एकमेकांत विलीन होऊन
मंगळ सूत्रामध्ये चार मनी ओवून
राहा सदैव एकमेकांचे होऊन
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा