शुक्रवार, ४ एप्रिल, २०१४

रान फुला रे रान फुला


     रान फुला रे रान फुला
सांग मला रे सांग मला
एकटा एकटा तू रहाशी रानी
आसपास ना तुझ्या रे कोणी
तुला भीती कशी रे वाटत नाही
कोण गाते  का तुजसाठी अंगाई

रान फुला रे रान फुला
सांग मला रे सांग मला

वाऱ्या वरती तू डुलत राहशी 
कि वाऱ्याशी बोलत राहशी
उन्हामधेही फुलत राहशी
कि प्रेमाचे गाणे गाशी

रान फुला रे रान फुला
सांग मला रे सांग मला

होशील का रे मित्र तू माझा
चल  दोघेही करू मजा
रानामध्ये बागडू अन पाण्यामध्ये रे खेळू
हिरव्या हिरव्या गवतावरती भान हरपून लोळू
उंच आकाशी जाऊ ,धपकन खाली य़ेऊ
वाऱ्याची झुळूक येता  गरकन गिरकी घेऊ

रान फुला रे रान फुला
सांग मला रे सांग मला


                   स्वलिखित 
                 नितीन खापरे
                दि .०४/०४/२०१४





कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत: