बुधवार, २७ ऑगस्ट, २०१४
मी पाहिलेय
मी पाहिलेय राजांना पडताना
पाहिलेय मी राज्य कोलमडताना
मी पाहिलेय राजांना पडताना
पाहिलेय मी राज्य कोलमडताना
लोकांच काय घेऊन बसलात
मी पाहिलेय पावलोपावली
लोकांना विश्वास तोडताना
स्वलिखित
नितीन खापरे
दि.२८/०८/२०१४
मंगळवार, १९ ऑगस्ट, २०१४
सोमवार, १८ ऑगस्ट, २०१४
शनिवार, १६ ऑगस्ट, २०१४
रविवार, १० ऑगस्ट, २०१४
रविवार, ३ ऑगस्ट, २०१४
सीमाभाग
सीमाभाग
दिल्या कितीही धमक्या
बंद केल सीमेच दार
तरी लक्षात ठेवा एक
वाढेल तलवारीची धार
मराठी आहोत आम्ही
नाही मानणार अशी हार
शिवबाचे नाव घेऊन
झेलू छाताडावर वार
काळे कानडी सरकार,
दडपशाही काळी ,
काळी कानडी मन
अन माणसेहि काळी
पण लक्षात ठेवा एक
आता आहे आमची पाळी
सरकार सकट करून टाकू
कर्नाटकची होळी
मराठ्यांनी तलवारी खाली ठेवल्यात
पण लढणे विसरलो नाही
आम्ही मागे लागलो तर
पाळायला कमी पडेल भूई
कानड्य़ानो थांबवा आता
सीमाभागातील हल्ले
बूरजसकट जागे करू
महाराष्ट्रातील किल्ले
सीमाभागातील मराठीनो
धीर नका सोडू
महाराष्ट्र तूमच्या सोबत आहे
आपण सोबत लढू
त्यांच्या अंगातली गोम
आपणच ठेचून काढू
मराठ्यानो भीमा,कृष्णेच पाणी
यांना नका सोडू
ते नक्की मात घेतील
आपण लढत राहू
एक दिवस कर्नाटकाला
बेळगावचे नाव देऊ
बेळगावच काय आख्खा कर्नाटक
महाराष्ट्रात घेऊ
स्वलिखित
नितीन खापरे
दि. ०४/०८/२०१४
शनिवार, २६ जुलै, २०१४
नागपंचमी
नागपंचमी
येरे येरे सापराया
आणिल्या मी दुध-लाह्या
वचन दे भाऊराया
येशील तू संकट समया
तुजसाठी मी उपवास धरते
दर्शनाने तुझ्या चिंता हरते
२१व्या शतकातही नागपंचमीचे
महत्व आहे
सापाला भाऊ मानण्याचे
मुलींचे तत्व आहे
विषारी असूनही सापाला
बहिणीचे ममत्व आहे
कदाचित बहिण भावाच्या प्रेमामुळेच
सापाला अमरत्व आहे
विष नसूनही डसनारा माणूस
पावलो-पावली भेटतो
यामुळेच विषारी साप
मुलींना भाऊ वाटतो
माणूस मुलीना चावला कि,
माणसाचा विचार गोठतो
म्हणूनच सापाला भाऊ मानण्याचा
मुलींचा विचार पटतो
बहिण भावाचे हे प्रेम
असेच वाढत जावो
सापासारखेच नागपंचमीलाही
अमरत्व प्राप्त होवो
स्वलिखित
नितीन खापरे
दि.२७/०७/२०१४
गुरुवार, २४ जुलै, २०१४
चारोळी
उठ रे मना
आता शहाण्यासारखं वागायचं
हे दुखःमय जीवन
आता नाही जगायचं
आजपासून बंद
तीझा फोटो बघायचं
देवाकडे फक्त
तिझ सुख मागायचं
आजपासून फक्त
स्वतःसाठी जगायचं
स्वलिखित
नितीन खापरे
दि.२४/०७/२०१४
याची सदस्यत्व घ्या:
पोस्ट (Atom)





