शुक्रवार, २८ मार्च, २०१४

कोलेज चे दिवस
कॅप्शन जोडा
          कोलेज चे दिवस

मनाच्या कोपऱ्यात जपून ठेवलेले
आठवणींच्या रेशीम दोरीने ओविलेले
कोलेज चे दिवस अचानक अठवले
आणि डोळे अलगद ओलावले


सकाळी सकाळी कॉलेजला जाने
वर्गात कमी आणि बाहेर जास्त राहणे
वर्गात गेलोच चुकून तर फक्त पोरींकडेच पहाणे
मग सरांनी सोडलेले शब्दांचे बाण
आणि तिने हसण्यासाठी केलेली ओठांची कमान


अभ्यास सोडून लागलेला तिचा छंद
ती येण्याआधी येणारा परफ्युम चा गंध
ती जाताना हसायची मंद
मी माझ्यातच गुंतलेला असायचो स्वच्छंद
मग मधेच मित्रांचे येणे
तिच्यावरून मारलेले टोमणे




कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत: