प्रेमाची कोडी
अजब असतात प्रेमाची कोडी
त्यांच्या नजरेत जग तर
जगाच्या नजरेत ती दोघ असतात वेढी
नजरा-नजर होते
जवळीकता येते
मग चालू होतो
भेटा-भेटीचा खेळ
खात बसतात बागेत
दोघात एकच भेळ
हळूच जुळू लागतो
दोघांच्या मनाचा मेळ
आकाश सजते,जमीन सजते
यांच्या क्रीडा बघून लाजाळूही लाजते
रात्री दिसतो दिवस आणि दिवसा दिसते रात्र
जुळतात मने जरी जुळत नसले गोत्र
तो तिला जवळ येण्यासाठी
करतो लाडी-गोडी
त्यांच्या नजरेत जग तर
जगाच्या नजरेत ती दोघ असतात वेढी
याचे कॉलेज बुडते
तिचा बुडतो क्लास
दोघांच्या मनी फक्त भेटण्याचा ध्यास
बागेमध्ये जमतात यांच्या गप्पांचे फड
ती बोलते त्याला किसही घेता येत नाही धड
तो बोलतो SORRY मी पहिल्यांदाच करतोय
ती बोलते माझे नाक कश्याला धरतोय
मग ती त्याला मांडीवर घेते
आणि तासंतास त्याची ओढत राहते दाढी
अजब असतात प्रेमाची कोडी
त्यांच्या नजरेत जग तर
जगाच्या नजरेत ती दोघ असतात वेढी
दिवसामागून दिवस जातात
महिन्या मागून महिने
दोघानाही अश्यक्य होते
दोघांचा विरह सहने
त्यांचे चालूच असते एकमेकांना भेटत राहणे
ती बोलते असे एकटक नकोस पाहू
तो बोलतो चल आपण दूर निघून जाऊ
दुसर्या दिवसी तो रिकामा आणि ती ब्याग घेऊन येते
दोघांची स्वारी दोघांच्या जगात दूर निघून जाते
लोकांच्या दृष्टीने SAD आणि
त्यांच्या दृष्टीने HAPPY एंडिंग होते
दूर कोठेतरी पोटाला मारून
तो घेत असतो तिच्यासाठी साडी
अजब असतात प्रेमाची कोडी
त्यांच्या नजरेत जग तर
जगाच्या नजरेत ती दोघ असतात वेढी
स्वलिखित
नितीन खापरे
दि.२९/०५/२०१४
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा