रविवार, १६ मार्च, २०१४

होळी


थंडीला मागे ठेऊन

होळी आली आज

ग्रिश्मातले उन घेऊन

होळी आली आज

धगधगती ज्वाला होउन

होळी आली आज

अनेक रंग लेऊन



चल सखे आज

आपण दोघे होळी खेळू

होऊ दे अंगाला स्पर्श

नको बनू लाजाळू

थांब जराशी अशी

नकोस दूर पळू

नाही झोम्बनार अंगाशी जास्त

रंग लावेन मी हळू

 बाजूला राहू दे काम-काज

होळी आली आज


रंग लावेन मी तुला

काळा  आणिक लाल

इकडे कर मुख

नको चोरूस तुझा गाल

थोडासा आवळेन

नाही करणार जास्त हाल

आज करावी वाटतेय

तुझ्याशी सलगीची चाल

पाहू दे डोळे भरून

नको ठेऊ काही राज

ये अशी मिठीत

होळी आली आज



                              स्वलिखित

                                 नितीन खापरे

                             दी. १६/०३/२०१४




कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत: