रविवार, २३ मार्च, २०१४

सुखात सगळे साथी

सुखात सगळे साथी

दुखात ना कोणी

स्वार्थी माणसांच्या जगात

रिकामीच  रहाते गोनी

धन-दौलत असेल

भोवती नाचतील इथे  भुते

दीन दारिद्रीच्या कोणी

करंगळीवरही न मुते

अजब इथले जिने

अजब जगाची रीत

सुखात इथे सगळे

हसत मनवतील  जीत

दुखत मात्र एकटे बसायचे

स्वतःचे आश्रू पीत

 जिंकल्यावर इथे

सगळेच जोडतात हात

तुमच्या सारखा कोणाचा

ते करत नाहीत थाट

हरल्यावर मात्र इथे

सगळेच फिरवतात पाठ

परकेच काय इथे

आपलेही करतात घात

अशीच आहे चाणाक्ष चतुर

धूर्त माणसाची जात

सुखात सगळे  साथी

दुखात ना कोणी

स्वार्थी माणसांच्या जगात

रिकामीच  रहाते गोनी


पैसा पैसा करू नको

शेवटी काय सोबत येणार

तुझेच सगे सोयरे

तुलाच रे  पेटवणार

दोन क्षण रडतील फक्त

सोबत कोणीच न येणार

साडे तीन हात जागा तुझी

संगे काय रे नेणार

  मरमर मरशील कष्ट करशील

पण तू जिंकूनही हरशील

मातीचा जीव मातीतच जाणार

शिल्लक काहीच ना राहणार

शेवटी उरतील खिन्न गाणी

सुखात सगळे  साथी

दुखात ना कोणी

स्वार्थी माणसांच्या जगात

रिकामीच  रहाते गोनी




                           स्वलिखित

                              नितीन

                          दी . २३/०३/२०१४

   



 
                                  
 




कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत: