तुझ्या आठवणीत..........
तुझ्या आठवणीत मी
अजूनही खदखद जळतोय
हृदयातील जखमेच दुख
डोळ्यामधून गाळतोय
आठवतात आपल्या
ऋनानुबंधमय भेटी
आठवतेय तू
धावत यायचीस माझ्यासाठी
सकाळ सांज माझेच नाव
असायचे तुझ्या ओठी
आठवतेय तुझी
थोडी सैल थोडी घट्ट मिठी
ठेवायचीस माझ्या खांद्यावरती
गोल गोल हनुवटी
कस सांगू तुला
मी अजूनही भळभळतोय
तुझ्या आठवणीत मी
अजूनही खदखद जळतोय
हृदयातील जखमेच दुख
डोळ्यामधून गाळतोय
आत्ता मघाशीच मी
मागे वळून पहिले
तुझ्या भासांव्यतिरिक्त तिथे
काहीच नाही राहिले
शिल्लक राहिलाय तो फक्त
एक उजाड माळ
शिल्लक राहिलाय तो फक्त
एक जीवघेणा काळ
शिल्लक राहिलाय तो फक्त
डोळ्यामधील जाळ
आणि मी रुतून बसलोय ज्यात
तो विरहरुपी गाळ
स्वतःला घाबरून
स्वतःच दूर पळतोय
तुझ्या आठवणीत मी
अजूनही खदखद जळतोय
हृदयातील जखमेच दुख
डोळ्यामधून गाळतोय
दुखाचे दिवस
संपतीलही उद्या
पण सांग ना कश्या थांबवू
डोळ्यातील नद्या
कसा आवरू आठवणीना
ज्या छळतात सध्या
कि विसरून तुला जवळ करू
जीवघेण्या मद्या
आठवणींचा भास
अजूनही मला छळतोय
तुझ्या आठवणीत मी
अजूनही खदखद जळतोय
हृदयातील जखमेच दुख
डोळ्यामधून गाळतोय
स्वलिखित
नितीन खापरे
दि . १८/०३/२०१४
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा