लाज वाटतेय मला
लाज वाटतेय मला
मराठी म्हणून घ्यायला
लाज वाटतेय शिवबा
तुमचा वारसा सांगायला
महाराष्ट्राच्या विकासात
मराठी माणूसच वजा आहे
मराठ्यांच्याच जीवावर
राजकारण्यांची मजा आहे
मराठीन्च्याच गळ्यावर
मराठीची भुजा आहे
भूमिपुत्र असूनही परप्रांतीयांसमोर
मराठी माणूस खुजा आहे
राजकारणी हसत बोलती
अर्धा महाराष्ट्र तुझा आणि अर्धा माझा आहे
तुम्ही हवे होते राजे आज
हा प्रपंच बघायला
लाज वाटतेय मला
मराठी म्हणून जगायला
लाज वाटतेय शिवबा
तुमचा वारसा सांगायला
आण्णा , शीखड्यानी हॉटेल थाटली
सिंधी,गुज्जुनी बिल्डरकीसाठी
जमीन लाटली
मात्र मराठींच्या श्रमान
मुंबई नटली
मराठीच्या हाती दारूची बाटली
आमच्या प्रगतीची नाळ इथेच तुटली
राजे सांगा ना मराठींना
स्वाभिमानान जगायला
लाज वाटतेय मला
मराठी म्हणून घ्यायला
लाज वाटतेय शिवबा
तुमचा वारसा सांगायला
राजे तुम्ही होता तेन्व्हा
अटकेपार झेंडे लावले
मुघालासारख्या राक्षसाला
तुम्हीच असमान दावले
हिंदुस्तानच्या बादशाहने
महाराष्ट्रात प्राण ठेवले
पण तुम्ही दिलेले वैभव
यांनी नाही हो टिकवले
महाराष्ट्राचे मस्तक आज
दिल्लीच्या पायावर आहे ठेवले
सांगा जरा यांना
स्वराज्य अबाधित राखायला
राजे तुम्हीच हवे होतात
आज यांना टोकायला
लाज वाटतेय मला
मराठी म्हणून घ्यायला
लाज वाटतेय शिवबा
तुमचा वारसा सांगायला
नितीन खापरे
स्वलिखित
दी. ०७/०३/२०१४
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा