बुधवार, ५ मार्च, २०१४

शब्द

शब्द

शब्दाची  किमया  अमाप  अन  अवीट

शब्दाने  माणूस  बनतसे  धीट

शब्दाचे सामर्थ्य  वक्त्याला विचारावे

श्रोत्यांना कसे मंत्रमुग्ध करावे

शब्द म्हणजे नसते फक्त एक ओळ

कडवट शब्द आणती

समोरच्याच्या हृदयात कळ

तसेच 

सामर्थ्यवान शब्द देतासि बळ


शब्दाविन माणूस होतसे मुका

शब्दाचीच रत्ने म्हणतसे तुका

म्हणून जनहो शब्द वापरा जपून

परत म्हणू नका SORY

शब्द गेला चुकून



                                   नितीन खापरे

                             स्वलिखित

                    दि. ०५/०३/२०१४

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत: