मंगळवार, ४ मार्च, २०१४

करीन म्हणतो शब्दांची सेवा
प्रतिभा यावी माझ्या अंगी
शब्दांची पूजा शब्दांचीच आरती
काव्य करण्या मज यावी स्पुर्ती
बांधीन म्हणतो काव्याचे इमले
कारण 
कवीला जमते जे रविला न जमले
शब्द वेलीला घालावे पाणी
बहरून  यावी माझी काव्य वेली
ईश्वरा मज काव्य सुचावे असे
काव्यात यावेत धावणारे ससे
काव्यात माझ्या म्हातारी आजी
काव्यात यावी प्रीत तीझी माझी
असावे त्यात डोळ्यातील पाणी
भुकेलेल्या गरीबाची करून कहाणी
जात्यावर ओव्या गाणारी जनी

यावी त्यात किर्र काळी रात्र
शिवाबासाठी लढणाऱ्या
मावळयाचे गोत्र
प्रजेवर असणारे शिवबाचे छत्र
 जीवन समृद्ध करणारे शब्दांचे सूत्र

काव्यात यावी हिमालयाची रांग
क्षणो क्षणी खवळ नारा सागर अथांग
गस्त घालणारा काळाभोर मांग
अन 
नेत्यांनी मारलेली जनतेला टांग

 उतणार ना मातणार मी
अविरत सेवा करीन
चुकले माकले तर
काव्यादेवतेचे पाय धरीन
येउ दे माझ्या अंगी
अमाप प्रतिभा
आव्हान देईन मी काळ्याभोर नभा

                                      नितीन
                        स्वलिखित
                  दि. ०५/०३/२०१४




कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत: