गुरुवार, २९ मे, २०१४
शनिवार, १० मे, २०१४
कातरवेळ
कातरवेळ
सकाळपासून चालू असतो
उन्हाचा सावलीशी
पाठशिवणीचा खेळ
चार नंतर आपसूक येते
सुखावणारी कातर वेळ
कातरवेळेत मन थंड, सुन्न होत
झाडामधून पडणारा हलता
पान हलताच कवडस्याच
अलगद गायब होण
हवा थांबली कि त्याच
पुन्हा जागेवर येण
प्राण नसलेल्या पाचोळ्याच
निपचित पडून रहाण
झुळूक येता हवेची
अलगद उडून जाण
फांदीच्या अडून ऐकू येत
चिमणीच चिव-चिव गाण
कातरवेळेत चालू असत
माझ अंगणात पहाण
निसर्गाने अचूक साधलाय
एकमेकांचा मेळ
चार नंतर आपसूक येते
सुखावणारी कातर वेळ
कातरवेळेत संथ विचार
मनामध्ये साचतात
थंड हिरवी झाडे पाहून
विचार माझे भिजतात
भिजलेल्या विचारांनी
काव्य माझे भिजलेले
त्या काव्यावेलीखाली आहे
हरणाचे कोकरू निजलेले
कोकराला हि आवडत असावा
याच वेळेचा खेळ
चार नंतर आपसूक येते
सुखावणारी कातर वेळ
स्वलिखित
नितीन खापरे
दि. १०/०५/२०१४
गुरुवार, ८ मे, २०१४
मंगळवार, १५ एप्रिल, २०१४
शुक्रवार, ११ एप्रिल, २०१४
एकलव्य
सर मी त्या तिकडे खालच्या वस्तीत राहतो
तुम्ही खूप ज्ञानी आहात बोलत होता जो-तो
ज्ञानाने तुमच्या प्रभावित होऊन
आलोय ज्ञान घ्यायला
फाटक्या डोक्याची झोळी आणलीय
नाही म्हणू नका द्यायला
ओंजळ पसरतोय तुमच्या पुढे
जमेल तेवढे टाका
जीवन भर ऋणी राहीन
नाही देणार धोका
जास्त काही नाही मला
जगायच कस शिकावा
जगत जगत दुसरऱ्याला
जगवायचंही दाखवा
सांगा मला सूर्याकड एकटक कस बघायचं
दुखात असूनही स्मित करत करत वागायचं
बी बनून काळ्या मातीमध्ये रुजायच
तहानेजुन ही दुसर्यांना पाणी कस पाजायच
शिकवा मला भाषा ,इतिहास आणि भूगोल
तुमच्या भाषेत कळू द्या विज्ञानाचे बोल
पाहू द्या समुद्रात उतरून किती आहे खोल
कळू द्या पृथ्वी का आहे गोल
आणि
किती असते मातेच्या ममत्वाला मोल
सांगा त्रास देणाऱ्या गुंडांना कसे नमवायचे
आपल्याच गुर्मीत असणाऱ्या राजकीय
घोड्यांना कसे दमवायचे
पैसा-अडक्यासोबत नाव कसे कमवायचे
नाराज झालेल्या लोकांना कोणत्या भाषेत मनवायचे
जमल तर शिकावा मला सत्य,आढळ राहायला
असत्याच्या टोळक्यमधून सत्याकडे पाहायला
कितीही मोठा असला तरी प्रवाहाविरुद्ध वहायला
स्वतःच्या संपत्ती मधून पिडीताना दान द्यायला
सांगा मला
जगाच्या भाषेत जगाशी कस लढायचं
हरलो तरी लढत लढत धारातीर्थी पडायचं
गोड बोलणाऱ्या लोकांतून स्वतःला बाहेर काढायचं
आणी
ओपचारीक्ता सोडून मनमोकळ रडायचं
इच्छा आहे माझी
तुमच्याकडूनच ज्ञान घेईन
वचन देतो अर्जुन नाही
एकलव्य होईन
गुरुदक्षिणा म्हणून अंगठाच काय ?
मस्तकहि माझ देईन
माफ करा सर थोड जास्त ज्ञान मागतोय
तुमच्याकड जरा जास्तच आशेन बघतोय
पण काळजी असू द्या तुमच ज्ञान मला
आयुष्यभर पुराव
मला पुरून थोडस मागच्यानाही उरावं
स्वलिखित
नितीन खापरे
दि. १२/०४/२०१४
तुम्ही खूप ज्ञानी आहात बोलत होता जो-तो
ज्ञानाने तुमच्या प्रभावित होऊन
आलोय ज्ञान घ्यायला
फाटक्या डोक्याची झोळी आणलीय
नाही म्हणू नका द्यायला
ओंजळ पसरतोय तुमच्या पुढे
जमेल तेवढे टाका
जीवन भर ऋणी राहीन
नाही देणार धोका
जास्त काही नाही मला
जगायच कस शिकावा
जगत जगत दुसरऱ्याला
जगवायचंही दाखवा
सांगा मला सूर्याकड एकटक कस बघायचं
दुखात असूनही स्मित करत करत वागायचं
बी बनून काळ्या मातीमध्ये रुजायच
तहानेजुन ही दुसर्यांना पाणी कस पाजायच
शिकवा मला भाषा ,इतिहास आणि भूगोल
तुमच्या भाषेत कळू द्या विज्ञानाचे बोल
पाहू द्या समुद्रात उतरून किती आहे खोल
कळू द्या पृथ्वी का आहे गोल
आणि
किती असते मातेच्या ममत्वाला मोल
सांगा त्रास देणाऱ्या गुंडांना कसे नमवायचे
आपल्याच गुर्मीत असणाऱ्या राजकीय
घोड्यांना कसे दमवायचे
पैसा-अडक्यासोबत नाव कसे कमवायचे
नाराज झालेल्या लोकांना कोणत्या भाषेत मनवायचे
जमल तर शिकावा मला सत्य,आढळ राहायला
असत्याच्या टोळक्यमधून सत्याकडे पाहायला
कितीही मोठा असला तरी प्रवाहाविरुद्ध वहायला
स्वतःच्या संपत्ती मधून पिडीताना दान द्यायला
सांगा मला
जगाच्या भाषेत जगाशी कस लढायचं
हरलो तरी लढत लढत धारातीर्थी पडायचं
गोड बोलणाऱ्या लोकांतून स्वतःला बाहेर काढायचं
आणी
ओपचारीक्ता सोडून मनमोकळ रडायचं
इच्छा आहे माझी
तुमच्याकडूनच ज्ञान घेईन
वचन देतो अर्जुन नाही
एकलव्य होईन
गुरुदक्षिणा म्हणून अंगठाच काय ?
मस्तकहि माझ देईन
माफ करा सर थोड जास्त ज्ञान मागतोय
तुमच्याकड जरा जास्तच आशेन बघतोय
पण काळजी असू द्या तुमच ज्ञान मला
आयुष्यभर पुराव
मला पुरून थोडस मागच्यानाही उरावं
स्वलिखित
नितीन खापरे
दि. १२/०४/२०१४
तुजवीण सख्या रे
आटूनी गेला स्नेह
सूकूनी गेल्या कळ्या
टाहो फोडीतो देह
ये परतूनी तू सख्या रे
किती मी वाट पाहू
वचन दिले होतेस तू मजला
अजन्म सोबत राहू
आठवत तुजला एकटीच बसते
स्तब्ध होऊनी तुजवर रुसते
स्तब्ध होऊनी तुजवर रुसते
डोळ्यातुनी आश्रू पाझरते
अश्रूंचा झाला डोह
हात धरुनी आठवण सांगते
आश्रूंच्या डोहात पोह
माझ्याच आश्रुत पोहू कशी मी
सांग सख्या रे नाहू कशी मी
तुजवीण आता राहू कशी मी
तुजवीण कोणाची होऊ कशी मी
होतसे तुझाच मोह
जग हे मजला स्मशान वाटे
तुजवीण सारे आनंद खोटे
स्वप्नी आला होतास पहाटे
ये तुझी मी वाट पहाते
मिटव जीवाचा दाह
स्वलिखित
नितीन खापरे
दि.११/०४/२०१४
अश्रूंचा झाला डोह
हात धरुनी आठवण सांगते
आश्रूंच्या डोहात पोह
माझ्याच आश्रुत पोहू कशी मी
सांग सख्या रे नाहू कशी मी
तुजवीण आता राहू कशी मी
तुजवीण कोणाची होऊ कशी मी
होतसे तुझाच मोह
जग हे मजला स्मशान वाटे
तुजवीण सारे आनंद खोटे
स्वप्नी आला होतास पहाटे
ये तुझी मी वाट पहाते
मिटव जीवाचा दाह
स्वलिखित
नितीन खापरे
दि.११/०४/२०१४
बुधवार, ९ एप्रिल, २०१४
प्रेम कराव अस
प्रेम कराव अस आपणाला हव तस
लक्षात ठेवावं एक
नात्याचं होऊ नये हस
हस झाल कि मग
रडू खूप येत
मनातल माणूस
मनामधून उतरूनच जात
मग प्रेमळ नात्याची
दातखीळच बसते
आपल्यासमोर दुनिया
आपल्याच नात्यावर हसते
नात्यात असावा
ओलावा,प्रेम आणि जिव्हाळा
नात्यासाठी लवाव
लावतो जसा लव्हाळा
प्रेम म्हणजे तरी काय ?
दूर असताना उणीव भासणे
आणि जवळ असताना
एकमेकांवर रुसणे
एकमेकांच्या डोळ्यात पाहणे
रुसल्यास जवळ घेणे
आणि मिठीमध्ये विरघळून जाने
पण या गोष्टींचा अर्थ खूप मोठा आहे
गुलाबाचा फाटा आहे
वरून सुंदर फुल असल
तरी खालती कार काटा आहे
प्रेमामुळेच कवी
गालिब वेढा झाला
लैला आणि मजनूने
प्राणत्याग केला
प्राणत्याग करून
काय साध्य झाले
ते गेले मरून अन
लोक विजयी झाले
प्रेम करायचे तर
करा जिवंत राहून
जगा एकमेकांसोबत
जा एकमेकांत विलीन होऊन
मंगळ सूत्रामध्ये चार मनी ओवून
राहा सदैव एकमेकांचे होऊन
स्वलिखित
नितीन खापरेदि . ०९/०४/२०१४
मंगळवार, ८ एप्रिल, २०१४
इलेक्शन फिवर
इलेक्शन फिवर
चालू झाला आता
इलेक्शन फिवर
दारूने भरून जातील
मतदाराचे लिव्हर
घरी जेवणार नाही कोनी
मतदान होईस्तोवर
जो तो दाखवत फिरेल
ज्याची त्याची पावर
कोणी एका बाटलीवर मत देईल
तर कोणी बाटली सोबत
चार-पाच हजारही घेईल
पैसा ज्याच्याकडे
सत्ता त्याच्या हाती जाईल
पुन्हा एकदा रामायणानंतर
महाभारत सुरु होईल
आणि पुन्हा लोकशाही रुपी द्रोपदी
नग्न उभी राहील
स्वार्थी मेडिया T.R.P. साठी
नग्न द्रोपदी उभ्या जगाला दावील
चार दिवस पुरवतील नेते
मतदाराचे लाड
आणि पाच वर्षात मोडून टाकतील
जनतेचे माकड हाड
कितीही पोसले तरी निरुपयोगीच शेवटी
काँग्रेसचे झाड
कमळाला कोठेही लावा
येत नसतो पाड
कोणाच्या गळ्यामध्ये
धर्माची गुंडी
तर कोणी वाटत सुटते
निरपेक्षतेची बुंदी
लोकशाहीत चार दिवस
असते जनतेची चांदी
आणि पाच वार्ष पायाखाली
येड्या बाभळीची फांदी
आणि जवळ असते ती फक्त
आशे ची फाटलेली चिंधी
स्वलिखित
नितीन खापरे
दि . ०८/०४/२०१४
रविवार, ६ एप्रिल, २०१४
आज मी प्राणघेण्य़ा मृत्यूशी लढलो
आज मी प्राणघेण्य़ा मृत्यूशी लढलो
उठलो, पडलो थोडासा रडलो
आज मी प्राणघेण्य़ा मृत्यूशी लढलो
संध्याकाळ होता होता सूर्य थोडा मंद झाला
मावळत्या सूर्याने चेहरा लालभुंद केला
तसा मी खिडकीचा दरवाजा बंद केला
दाराच्या सांधीतून मृत्यू आतमध्ये आला
आल्या-आल्या त्याने छातीवर हल्ला केला
मी खाली पडलो, उठतच बडबडलो
कोण रे तू,धक्का का दिला ?
तो बोलला मी मृत्यू,यमाने पाठविले मला
चल माझ्यासोबत काळ तुझा आला
मी बोललो दुखी,कष्टी होतो मी प्राण्यासारखा वागलो
स्वतःचे अश्रू पीत पीत दुखामधेच जगलो
माणसात आलोय आता माणसासारख वागू दे
आत्ता कुठे सुख आलय,चार दिस बघू दे
अजून जरा थांब मला थोड जगू दे
पण आईकतोय तो मृत्यू कसला
तो हट्ट धरूनच बसला
तो थोडा मागे सरला,चाबूक माझ्यावर उगारला
चल माझ्या सोबत तुला यावच लागेल
तू नाही आलास तर यम प्राण माझे मागेल
मी बोललो येईन सोबत पण माझी आहे इच्छा
माझी कपडे तू घाल मग करेन तुझा पीच्छा
हो म्हणून त्याने केली कपड्यांची प्राप्ती
मी लगेच लढवली छानपैकी युक्ती
मृत्यूला सोडून यमाचीच केली थोडी भक्ती
श्वास घेतो ना घेतो तोच यम तिथे आला
आणि माझ्या कपड्य़ामधल्या मृत्यूलाच घेऊन गेला
स्वलिखित
नितीन खापरे
दि . ०६/०४/२०१४
शुक्रवार, ४ एप्रिल, २०१४
रान फुला रे रान फुला
रान फुला रे रान फुला
सांग मला रे सांग मला
एकटा एकटा तू रहाशी रानी
आसपास ना तुझ्या रे कोणी
तुला भीती कशी रे वाटत नाही
कोण गाते का तुजसाठी अंगाई
रान फुला रे रान फुला
सांग मला रे सांग मला
वाऱ्या वरती तू डुलत राहशी
कि वाऱ्याशी बोलत राहशी
उन्हामधेही फुलत राहशी
कि प्रेमाचे गाणे गाशी
रान फुला रे रान फुला
सांग मला रे सांग मला
होशील का रे मित्र तू माझा
चल दोघेही करू मजा
रानामध्ये बागडू अन पाण्यामध्ये रे खेळू
हिरव्या हिरव्या गवतावरती भान हरपून लोळू
उंच आकाशी जाऊ ,धपकन खाली य़ेऊ
वाऱ्याची झुळूक येता गरकन गिरकी घेऊ
रान फुला रे रान फुला
सांग मला रे सांग मला
स्वलिखित
नितीन खापरे
दि .०४/०४/२०१४
याची सदस्यत्व घ्या:
पोस्ट (Atom)






