रविवार, ६ एप्रिल, २०१४
शुक्रवार, ४ एप्रिल, २०१४
रान फुला रे रान फुला
रान फुला रे रान फुला
सांग मला रे सांग मला
एकटा एकटा तू रहाशी रानी
आसपास ना तुझ्या रे कोणी
तुला भीती कशी रे वाटत नाही
कोण गाते का तुजसाठी अंगाई
रान फुला रे रान फुला
सांग मला रे सांग मला
वाऱ्या वरती तू डुलत राहशी
कि वाऱ्याशी बोलत राहशी
उन्हामधेही फुलत राहशी
कि प्रेमाचे गाणे गाशी
रान फुला रे रान फुला
सांग मला रे सांग मला
होशील का रे मित्र तू माझा
चल दोघेही करू मजा
रानामध्ये बागडू अन पाण्यामध्ये रे खेळू
हिरव्या हिरव्या गवतावरती भान हरपून लोळू
उंच आकाशी जाऊ ,धपकन खाली य़ेऊ
वाऱ्याची झुळूक येता गरकन गिरकी घेऊ
रान फुला रे रान फुला
सांग मला रे सांग मला
स्वलिखित
नितीन खापरे
दि .०४/०४/२०१४
शुक्रवार, २८ मार्च, २०१४
![]() |
| कॅप्शन जोडा |
मनाच्या कोपऱ्यात जपून ठेवलेले
आठवणींच्या रेशीम दोरीने ओविलेले
कोलेज चे दिवस अचानक अठवले
आणि डोळे अलगद ओलावले
सकाळी सकाळी कॉलेजला जाने
वर्गात कमी आणि बाहेर जास्त राहणे
वर्गात गेलोच चुकून तर फक्त पोरींकडेच पहाणे
मग सरांनी सोडलेले शब्दांचे बाण
आणि तिने हसण्यासाठी केलेली ओठांची कमान
अभ्यास सोडून लागलेला तिचा छंद
ती येण्याआधी येणारा परफ्युम चा गंध
ती जाताना हसायची मंद
मी माझ्यातच गुंतलेला असायचो स्वच्छंद
मग मधेच मित्रांचे येणे
तिच्यावरून मारलेले टोमणे
रविवार, २३ मार्च, २०१४
सुखात सगळे साथी
सुखात सगळे साथी
दुखात ना कोणी
स्वार्थी माणसांच्या जगात
रिकामीच रहाते गोनी
धन-दौलत असेल
भोवती नाचतील इथे भुते
दीन दारिद्रीच्या कोणी
करंगळीवरही न मुते
अजब इथले जिने
अजब जगाची रीत
सुखात इथे सगळे
हसत मनवतील जीत
दुखत मात्र एकटे बसायचे
स्वतःचे आश्रू पीत
जिंकल्यावर इथे
सगळेच जोडतात हात
तुमच्या सारखा कोणाचा
ते करत नाहीत थाट
हरल्यावर मात्र इथे
सगळेच फिरवतात पाठ
परकेच काय इथे
आपलेही करतात घात
अशीच आहे चाणाक्ष चतुर
धूर्त माणसाची जात
सुखात सगळे साथी
दुखात ना कोणी
स्वार्थी माणसांच्या जगात
रिकामीच रहाते गोनी
पैसा पैसा करू नको
शेवटी काय सोबत येणार
तुझेच सगे सोयरे
तुलाच रे पेटवणार
दोन क्षण रडतील फक्त
सोबत कोणीच न येणार
साडे तीन हात जागा तुझी
संगे काय रे नेणार
मरमर मरशील कष्ट करशील
पण तू जिंकूनही हरशील
मातीचा जीव मातीतच जाणार
शिल्लक काहीच ना राहणार
शेवटी उरतील खिन्न गाणी
सुखात सगळे साथी
दुखात ना कोणी
स्वार्थी माणसांच्या जगात
रिकामीच रहाते गोनी
स्वलिखित
नितीन
दी . २३/०३/२०१४
मंगळवार, १८ मार्च, २०१४
तुझ्या आठवणीत..........
तुझ्या आठवणीत मी
अजूनही खदखद जळतोय
हृदयातील जखमेच दुख
डोळ्यामधून गाळतोय
आठवतात आपल्या
ऋनानुबंधमय भेटी
आठवतेय तू
धावत यायचीस माझ्यासाठी
सकाळ सांज माझेच नाव
असायचे तुझ्या ओठी
आठवतेय तुझी
थोडी सैल थोडी घट्ट मिठी
ठेवायचीस माझ्या खांद्यावरती
गोल गोल हनुवटी
कस सांगू तुला
मी अजूनही भळभळतोय
तुझ्या आठवणीत मी
अजूनही खदखद जळतोय
हृदयातील जखमेच दुख
डोळ्यामधून गाळतोय
आत्ता मघाशीच मी
मागे वळून पहिले
तुझ्या भासांव्यतिरिक्त तिथे
काहीच नाही राहिले
शिल्लक राहिलाय तो फक्त
एक उजाड माळ
शिल्लक राहिलाय तो फक्त
एक जीवघेणा काळ
शिल्लक राहिलाय तो फक्त
डोळ्यामधील जाळ
आणि मी रुतून बसलोय ज्यात
तो विरहरुपी गाळ
स्वतःला घाबरून
स्वतःच दूर पळतोय
तुझ्या आठवणीत मी
अजूनही खदखद जळतोय
हृदयातील जखमेच दुख
डोळ्यामधून गाळतोय
दुखाचे दिवस
संपतीलही उद्या
पण सांग ना कश्या थांबवू
डोळ्यातील नद्या
कसा आवरू आठवणीना
ज्या छळतात सध्या
कि विसरून तुला जवळ करू
जीवघेण्या मद्या
आठवणींचा भास
अजूनही मला छळतोय
तुझ्या आठवणीत मी
अजूनही खदखद जळतोय
हृदयातील जखमेच दुख
डोळ्यामधून गाळतोय
स्वलिखित
नितीन खापरे
दि . १८/०३/२०१४
रविवार, १६ मार्च, २०१४
होळी
थंडीला मागे ठेऊन
होळी आली आज
ग्रिश्मातले उन घेऊन
होळी आली आज
धगधगती ज्वाला होउन
होळी आली आज
अनेक रंग लेऊन
चल सखे आज
आपण दोघे होळी खेळू
होऊ दे अंगाला स्पर्श
नको बनू लाजाळू
थांब जराशी अशी
नकोस दूर पळू
नाही झोम्बनार अंगाशी जास्त
रंग लावेन मी हळू
बाजूला राहू दे काम-काज
होळी आली आज
रंग लावेन मी तुला
काळा आणिक लाल
इकडे कर मुख
नको चोरूस तुझा गाल
थोडासा आवळेन
नाही करणार जास्त हाल
आज करावी वाटतेय
तुझ्याशी सलगीची चाल
पाहू दे डोळे भरून
नको ठेऊ काही राज
ये अशी मिठीत
होळी आली आज
स्वलिखित
नितीन खापरे
दी. १६/०३/२०१४
बुधवार, १२ मार्च, २०१४
आयुष्याच्या शिदोरीतून.........
आयुष्याच्या शिदोरीतून………
मंदाळलेल्या रात्रीगात
अलगद वहात जावे
आयुष्याच्या शिदोरीतून
मी स्वतःस काही द्यावे
आयुष्यकोडे जगताना
मी जगास खूप दिले
तरीही आशेने बघती
मजकडे दीन मुले
वाटणीचे माझ्या सुखअमृत
जनास मी दिले
तयांचे दुखाश्रू
हसत मी पिले
वाटतसे आता मला
मजसाठी काही करावे
आयुष्यगाणे गाताना
जिंकूनहि हरावे
फेसाळलेल्या समुद्रागत
उंच लाट व्हावे
आयुष्याच्या शिदोरीतून
मी स्वतःस काही द्यावे
ते झाड माझे
मीच लाविले
त्याचे फळ मी
जनास दिले
ते फुलही माझे
मीच फुलविले
जनास देऊन
काटे मजकडे ठेविले
आयुष्याच्या वाटेवरती
मी सर्वांच्या कामी आलो
खंत वाटे माझी मला
मी माझाच नाही झालो
सगळ्य़ा वरती प्रेम करता
स्वतःस विसरून गेलो
आता मात्र वाटे मला
मजसाठी थोडे गावे
आयुष्याच्या शिदोरीतून
मी स्वतःस काही द्यावे
स्वलिखित
नितीन खापरे
दि . १५/०३/२०१४
शुक्रवार, ७ मार्च, २०१४
लाज वाटतेय मला
लाज वाटतेय मला
मराठी म्हणून घ्यायला
लाज वाटतेय शिवबा
तुमचा वारसा सांगायला
महाराष्ट्राच्या विकासात
मराठी माणूसच वजा आहे
मराठ्यांच्याच जीवावर
राजकारण्यांची मजा आहे
मराठीन्च्याच गळ्यावर
मराठीची भुजा आहे
भूमिपुत्र असूनही परप्रांतीयांसमोर
मराठी माणूस खुजा आहे
राजकारणी हसत बोलती
अर्धा महाराष्ट्र तुझा आणि अर्धा माझा आहे
तुम्ही हवे होते राजे आज
हा प्रपंच बघायला
लाज वाटतेय मला
मराठी म्हणून जगायला
लाज वाटतेय शिवबा
तुमचा वारसा सांगायला
आण्णा , शीखड्यानी हॉटेल थाटली
सिंधी,गुज्जुनी बिल्डरकीसाठी
जमीन लाटली
मात्र मराठींच्या श्रमान
मुंबई नटली
मराठीच्या हाती दारूची बाटली
आमच्या प्रगतीची नाळ इथेच तुटली
राजे सांगा ना मराठींना
स्वाभिमानान जगायला
लाज वाटतेय मला
मराठी म्हणून घ्यायला
लाज वाटतेय शिवबा
तुमचा वारसा सांगायला
राजे तुम्ही होता तेन्व्हा
अटकेपार झेंडे लावले
मुघालासारख्या राक्षसाला
तुम्हीच असमान दावले
हिंदुस्तानच्या बादशाहने
महाराष्ट्रात प्राण ठेवले
पण तुम्ही दिलेले वैभव
यांनी नाही हो टिकवले
महाराष्ट्राचे मस्तक आज
दिल्लीच्या पायावर आहे ठेवले
सांगा जरा यांना
स्वराज्य अबाधित राखायला
राजे तुम्हीच हवे होतात
आज यांना टोकायला
लाज वाटतेय मला
मराठी म्हणून घ्यायला
लाज वाटतेय शिवबा
तुमचा वारसा सांगायला
नितीन खापरे
स्वलिखित
दी. ०७/०३/२०१४
बुधवार, ५ मार्च, २०१४
चारोळी
गेली ती मला सोडून
सुखात असेल यार
सांगा तिला कोन्हीतरी
मी हि आनंदात आहे फार
जास्त काही नाही
फक्त अश्रू गळतात चार
नितीन खापरे
स्वलिखित
दि. ०५/०३/२०१४
शब्द
शब्द
शब्दाची किमया अमाप अन अवीट
शब्दाने माणूस बनतसे धीट
शब्दाचे सामर्थ्य वक्त्याला विचारावे
श्रोत्यांना कसे मंत्रमुग्ध करावे
शब्द म्हणजे नसते फक्त एक ओळ
कडवट शब्द आणती
समोरच्याच्या हृदयात कळ
तसेच
सामर्थ्यवान शब्द देतासि बळ
शब्दाविन माणूस होतसे मुका
शब्दाचीच रत्ने म्हणतसे तुका
म्हणून जनहो शब्द वापरा जपून
परत म्हणू नका SORY
शब्द गेला चुकून
नितीन खापरे
स्वलिखित
दि. ०५/०३/२०१४
याची सदस्यत्व घ्या:
पोस्ट (Atom)




